World Water Day : का साजरा केला जातो जागतिक जल दिन?

जगातील लोक जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे पाणी वाया घालवतात आणि लवकरच सर्वांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच, जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये जलसंवर्धनासारख्या विषयांवर जागरूकता निर्माण केली जाते.

38
जगाचा ७० टक्के भाग पाण्याने वेढलेला आहे आणि यातील ९७ टक्के पाणी पिण्यायोग्य नाही. संपूर्ण जग फक्त ३ टक्के पाण्यावर जगतं. ही शोकांतिका आहे. आपण सर्वांनी मिळून पाण्याचे संवर्धन करणे व महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच २२ मार्चला जागतिक जल दिन (World Water Day in Marathi) साजरा केला जातो.
१९९२ मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (UNCED) शिफारसीनंतर, १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (UN) २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन (World Water Day in Marathi) म्हणून घोषित केला. तेव्हापासून जागतिक जल दिन सातत्याने साजरा केला जात आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे आणि त्याचे महत्त्व समजून घेऊन, दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो.
जागतिक जल दिनाचे (World Water Day in Marathi) महत्त्व अधोरेखित केले पाहिजे, कारण अहवालांनुसार, जगातील २ अब्जाहून अधिक लोक अजूनही सुरक्षित पिण्याच्या पाण्याशिवाय जगत आहेत. घाणेरडे पाणी आणि स्वच्छतेच्या कमकुवत व्यवस्थेमुळे होणाऱ्या अतिसारामुळे दर दोन मिनिटांनी पाच वर्षांखालील एका मुलाचा मृत्यू होतो. वेगाने वाढणारे कारखाने आणि लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. जगातील लोक जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे पाणी वाया घालवतात आणि लवकरच सर्वांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच, जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये जलसंवर्धनासारख्या विषयांवर जागरूकता निर्माण केली जाते.
आपल्या जीवनात पिण्याच्या पाण्याची महत्त्वाची भूमिका आणि त्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन सुज्ञपणे करण्याची गरज यावर लक्ष वेधणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. दरवर्षी जागतिक जल दिनाची (World Water Day in Marathi)  थीम पाण्याशी संबंधित मुद्द्यांवर केंद्रित असते. २०२४ ची थीम ‘शांततेसाठी पाणी’ होती. २०२५ ची थीम ‘माउंटन वॉटर अँड क्रायोस्फीअर’ अशी आहे. चला तर या जल दिनानिमित्त आपणही पाण्याचे संवर्धन करु जेणेकरुन आपल्या येणार्‍या पिढीला कधीच पाण्याची कमतरता भासणार नाही!
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.