World Zoonoses Day का साजरा केला जातो? जाणून घ्या ऐतिहासिक तथ्ये!

136
World Zoonoses Day का साजरा केला जातो? जाणून घ्या ऐतिहासिक तथ्ये!
World Zoonoses Day का साजरा केला जातो? जाणून घ्या ऐतिहासिक तथ्ये!

६ जुलै या दिवशी रेबिजच्या विरोधात केलेल्या पहिल्या लसीकरणाच्या निमित्ताने २००७ सालापासून दरवर्षी जागतिक झुनोसिस दिन (World Zoonoses Day) साजरा करण्यात येतो. फ्रेंच जीवशास्त्रज्ञ ल्युई पाश्चर यांनी रेबिजच्या लसीचा शोध लावला होता. त्यांनी १८८५ साली पहिली रेबिजची लस तयार केली होती.

(हेही वाचा- Ravindra Waikar: रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट!)

२००७ सालापासून दरवर्षी ६ जुलै हा दिवस झुनोटिक रोगांविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी, तसेच झुनोटिक रोगांविषयी माहिती देण्यासाठी आणि आरोग्य सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना झुनोटिक रोग आणि त्यावरचे प्रतिबंध उपाय यांबद्दलची माहिती मिळावी म्हणून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी साजरा करण्यात येतो. (World Zoonoses Day)

प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या संसर्ग रोगांना झूनोटिक रोग असं म्हणतात. हे संसर्गजन्य रोग असतात. काही वेळेस असं होतं की, झुनोटिक झालेल्या माणसाच्या संपर्कात निरोगी प्राणी आला तर त्या प्राण्याला माणसापासून झुनोटिक आजार होऊ शकतो. त्याला रिव्हर्स झुनोसिस असं म्हणतात. (World Zoonoses Day)

(हेही वाचा- Chhattisgarh: विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू, विषारी वायू गळतीमुळे गमावला जीव; एसडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले…)

झुनोटिक संसर्गजन्य रोग प्राण्यांचं मल-मूत्र, रक्त, लाळ, श्लेष्मा किंवा प्राण्यांच्या शरीरावरच्या कोणत्याही प्रकारच्या द्रवपदार्थाच्या संपर्कात आल्याने पसरतो. मग तो संपर्क प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्षरित्या झालेला असो, तरी रोगाची लागण होतेच. (World Zoonoses Day)

या प्रकारच्या रोगांमध्ये डास आणि पिसवा चावल्यामुळे होणारे रोगही असतात. असे संसर्गजन्य रोग जिवाणू, विषाणू आणि बुरशीमुळेही पसरतात. हे आजार बऱ्याचदा गंभीर प्रकारचेही होऊ शकतात. ज्यामुळे माणसांना गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं आणि कधीकधी जिवालाही मुकावं लागतं. (World Zoonoses Day)

(हेही वाचा- Pune Crime: पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न!)

सध्या संपूर्ण जगभरात माहिती असलेले दोनशेहून जास्त झुनोटिक रोग अस्तित्वात आहेत. पशूंपासून पसरणाऱ्या रोगांना आळा बसवण्यासाठी प्रयत्न नाही केले तर भविष्यातही कोविड १९ सारख्या आजारांना सामोरं जावं लागेल. (World Zoonoses Day)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.