रशिया-युक्रेनच्या वादात ट्वीटरवर का ट्रेंड होत आहे #Kargil?

113

सध्या जगभरात रशिया-युक्रेन युद्धाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. जगभरात हळूहळू तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले आहेत. हे युद्ध थांबवा म्हणून युक्रेनचे नागरिक मदतीची याचना करत असताना युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलेन्स्की सुद्धा अन्य राष्ट्रांकडे मदत मागत आहे. अमेरिका, नाटोमधील बलाढ्य राष्ट्रांनी युक्रेनकडे पाठ फिरवल्यावर जगाच्या नकाशावर युक्रेन एकटा पडला आहे, असा आरोप युक्रेनच्या राष्ट्रपतींसह, नागरिकांनी केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत, चीन आणि युएई या राष्ट्रांनी तटस्थ भूमिका स्वीकारली. ट्वीटरवर सुद्धा यासंदर्भात अनेक हॅशटॅग ट्रेंड होत आहेत, या दरम्यान ट्वीटरवर #Kargil (कारगिल) असे ट्रेंड होत आहे. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धाचा उल्लेख करत नेटकऱ्यांनी भारत देश व आपल्या सैनिकांनी कशी एकाकी झुंज दिली याचा उल्लेख केला आहे.

( हेही वाचा : रशिया-युक्रेन युद्धात भारताने घेतली महत्वाची भूमिका! )

तटस्थ भूमिकेचा आक्षेप

१९६१, १९६५, १९७१ त्यानंतर १९९९चे कारगिल युद्धाप्रसंगी भारतानेही जगभरातील इतर राष्ट्रांकडे मदतीची मागणी केली होती. चीनने आक्रमण केल्यानंतर लगेचच पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले होते. यावेळी भारताची अतिशय बिकट स्थिती झाली होती. परंतु या सर्व युद्धप्रसंगांना भारताच्या तिन्ही दलांच्या सैन्याने मोठ्या धीराने तोंड दिले होते.

रशिया-युक्रेन वादावर भारताने तटस्थ भूमिका घेतल्यामुळे अनेकांनी आक्षेप घेतला, पण त्याकाळी भारत एकटा लढत असताना १९७१ साली भारत-रशिया करार झाला होता. त्यामुळे जुना मित्र रशियाकडे दुर्लक्ष करून भारत युक्रेनच्या पाठीशी कसा जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही भारताने अत्यंत धोरणीपणा दाखवत रशियाच्या हल्ल्याचा निषेध केला, परंतु संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये मतदान टाळले.

अमेरिकेनी मदत नाकारली 

कारगिल युद्धाप्रसंगी अमेरिकेसारखा बलाढ्य देश भारताचा प्रमुख शत्रू पाकिस्तान आणि दहशतवादी गट असलेल्या तालिबानला आर्थिक मदत करत होता. कारगिलमध्ये अमेरिका नाही तर इस्रायल भारताच्या बचावासाठी आला होता. त्यामुळे इस्रायल हा भारताचा खूप चांगला मित्रदेश म्हणून ओळखला जातो.

भारतही वर नमूद केलेल्या सर्व युद्धाप्रसंगी एकटा लढत होता. कोणीही भारताला मदक केली नाही, त्यामुळे आता भारताने घेतलेली भूमिका योग्य आहे, असे नेटकरी म्हणत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.