सध्या आपल्या सर्वात जवळची गोष्ट म्हणजे मोबाईल. कोणालाही मोबाईल नंबर देताना, समोरचा तो नंबर 10 अंकी आहे का ते आधी तपासून घेतो. पण मोबाईल नंबर हा दहा अंकीच का असतो? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? मोबाईल नंबर दहा अंकी असण्यामागे कारण काय आहे ते जाणून घेऊया.
सध्या जगभरात अनेक देशांमधील मोबाईल नंबर हे दहा किंवा अकरा अंकीच असतात. ब्रिटन आणि चीनमध्ये 11 अंकी नंबर पाहायला मिळतात. 2003 साली भारतात 9 अंकी मोबाईल नंबर होते, परंतु ही पद्धत बदलून नंबर 10 अंकी करण्यात आले.
मोबईल नंबर 10 अंकी असण्यामागे कारण सरकारची राष्ट्रीय क्रमांक योजना म्हणजेच NNP आहे.
लोकसंख्या विचारात घेऊन मोबाईल नंबरची निर्मिती
मोबाईल नंबर 10 अंकी असण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपली लोकसंख्या. समजा, जर मोबाईल नंबर फक्त एक अंकी असेल, तर शुन्य ते नऊ पर्यंत फक्त 10 नंबर तयार करता येतील. 10 लोक ते 10 नंबर वापरु शकतील. दुसरीकडे, जर फक्त दोन नंबरचा अंक हा मोबाईल नंबर असेल, तर शून्य ते 99 पर्यंत फक्त 100 नंबर करता येतील, ज्याचा वापर फक्त 100 लोक करु शकतील. सध्या आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. त्यानुसार, 9 आकड्यांचा मोबाईल नंबर असेल, तर भविष्यात सर्व लोकांना मोबाईल क्रमांक देण्यात अडचणी निर्माण होतील.
दुसरीकडे 10 अंकी मोबाईल नंबर बनवला तर गणनेनुसार, 1 हजार कोटी वेगवेगळे नंबर तयार होऊ शकतात. तसेच 1 हजार कोटी लोकांना मोबाईल नंबर सहज देता येतील. त्यामुळे 10 अंकी मोबाईल क्रमांक तयार करण्यात आले.
( हेही वाचा :‘आधी लगीन कोंढाण्याचे, नंतर रायबाचे’ त्या रायबाचे पुढे काय झाले? )
आपला मोबाईल नंबर काय दर्शवतो
मोबाईल नंबर हे नुसते काही अंक एकत्र करुन तयार केलेले नाहीत. सर्व मोबाईल नंबरमध्ये 3 गोष्टी समाविष्ट असतात. 2 अंकी अॅक्सेस कोड, 3 अंकी प्रोव्हायडर कोड आणि 5 अंकी सबस्क्राइबर कोड.
Join Our WhatsApp Community