रेल्वे स्टेशन्सवर का मिळते फक्त ‘रेल नीर’? वाचा संपूर्ण माहिती

140

तुम्ही रेल्वेने नेहमी ये-जा करणारे प्रवासी आहात आणि तुम्ही तहान लागल्यावर रेल्वेच्या स्टॉलवरुन पाण्याची बाटली खरेदी केली नाही, असं अगदी क्वचितच घडलं असेल. रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर केवळ 15 रुपयांत ‘रेल नीर’ची एक लिटर पाण्याची बाटली आपल्याला मिळते आणि आपली तहान भागते.

पण काही वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्सवर केवळ रेल नीर नाही तर इतर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रॅन्डस च्या देखील पाण्याच्या बाटल्या मिळत असत. पण आता आपल्याला केवळ भारतीय रेल्वेच्या ‘रेल नीर’या ब्रँडचीच पाण्याची बाटली रेल्वेच्या स्टॉल्सवर मिळते. हे असं का, त्याचीच माहिती आपण घेऊया.

(हेही वाचाः Google ने प्ले स्टोअरवरुन हटवली ही 13 Apps, तुमच्या फोनमध्येही असतील तर डिलीट करा)

न्यायालयात याचिका

रेल्वेच्या स्टॉल्सवर केवळ रेल नीरचे पाणी मिळत असल्याने त्याबाबत एक जनहित याचिका जानेवारी 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. जर प्रवाशांना पदार्थ निवडण्याचे स्वातंत्र्य आहे तर मग त्यांच्यावर रेल नीरचे पाणी घ्यायची सक्ती का, असा सवाल त्यावेळी न्यायालयाने आयआरसीटीसीला केला होता. त्यावेळी आयआरसीटीसीकडून न्यायालयात बाजू मांडण्यात आली.

IRCTC चे स्पष्टीकरण

इतर पाण्याच्या ब्रँडची विक्री रेल्वे स्थानकांतील स्टॉलवर होत असल्याने रेल्वेचे उत्पादन असलेल्या रेल नीरचा खप मंदावला. त्यामुळे रेल्वेचे फार मोठे नुकसान होते. रेल नीरचे पाणी हे अत्यंत शुद्ध आणि प्रवाशांना परवडणा-या किंमतीत मिळते. इतर ब्रँडपेक्षा रेल नीरची किंमतही कमी आहे, असे स्पष्टीकरण यावेळी आयआरसीटीसीकडून न्यायालयात देण्यात आले होते. तसेच प्रवाशांना विमानाप्रमाणे स्वतःजवळील पाण्याची बाटली बाळगण्यास रेल्वेने कोणताही बंदी घातलेली नाही, असेही आयआरसीटीसीने म्हटले होते. त्यामुळेच रेल नीर हे स्टेशन्सवरील स्टॉलवर विक्रीसाठी असते.

‘रेल नीर’चे 14 प्लांट

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन(IRCTC)ने 2003 मध्ये रेल नीरचा पहिला प्लांट दिल्लीतील नांगलोई येथे उभारला होता. दिल्लीहून सुटणा-या राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस मधील प्रवाशांना स्वच्छ आणि स्वस्त पाणी देण्याच्या उद्देशाने हा प्लांट सुरू करण्यात आला होता. सध्या आयआरसीटीसीचे 14 प्लांट कार्यरत आहेत. याठिकाणीहूनच रेल नीरचा पुरवठा करण्यात येतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.