गिरगावच्या ‘त्या’ प्रेक्षक गॅलरीचे रश्मी ठाकरे यांच्या हस्ते का झाले उदघाटन?

137

‘क्वीन नेकलेस’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गासह गिरगाव चौपाटीचे विलोभनीय, विहंगम व मनमोहक दर्शन घडविणा-या ‘स्वराज्यभूमी’ गिरगांव चौपाटी लगतच्या ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण रविवारी करण्यात आले. याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यांच्या हस्ते करण्यात येणार होते. परंतु हे लोकार्पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते, मग आयत्या वेळी याची फित रश्मी ठाकरे यांच्या हस्ते का कापण्याचा निर्णय घेण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीआरझेडच्या नियमांचे पालन न करता हे बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांनी याचे लोकार्पण करण्याचे टाळले का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : जरा जपून! सोशल मीडियावर पोस्ट टाकताय? मुंबई पोलिसांचा राहणार वॉच )

अवघ्या ८ महिन्यांत प्रकल्प पूर्ण

‘स्वराज्यभूमी’ अर्थात ‘गिरगाव चौपाटी’लगत नव्याने उभारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी होणार होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या ‘दर्शक गॅलरी’ चे भूमिपूजन गेल्यावर्षी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या ८ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते.

महापालिकेची पर्जन्य जलवाहिनी 

राज्यभूमी गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला व नेताजी सुभाष मार्ग व कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी मुंबई महानगरपालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन जलवाहिनीच्या पातमुखावरती सुमारे ४८३ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याचे काम ३ सप्टेंबर २०२१ पासून सुरु करण्यात आले होते. समुद्राचे, चौपाटीचे आणि ‘क्विन्स नेकलेस’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय, विहंगम व मनमोहक दर्शन घडविणा-या या गॅलरीची उभारणी करण्यात आली आहे. दर्शक गॅलरी’ अर्थात सदर ‘व्ह्युईंग डेक’वर एकाच वेळेस किमान ५०० पर्यटकांना सागरी सौंदर्य न्याहाळता येणार आहे. तसेच ‘नेताजी सुभाष मार्ग’ अर्थात राणीच्या रत्नहाराप्रमाणे दिसणा-या ‘मरिन ड्राईव्ह’चे विहंगम दृश्य हे डोळ्याचे पारणे फेडणारे असणार आहे. प्रकल्पाचा मूळ कालावधी १२ महिन्यांचा असून सुद्धा सदर प्रकल्प ८ महिन्यांतच पूर्ण करण्यात आला आहे.

१ एप्रिल २०२२ रोजी गिरगाव चौपाटीवरील प्रेक्षक गॅलरी अर्थात व्हिविंग गॅलरीच्या बांधकामावर भाजपने आक्षेप नोंदवला होता. गॅलरीचे पक्के बांधकाम कुठलेही सीआरझेड नियमांतर्गत परवानगी न घेता समुद्रातून खांब (पिलर्स) बांधून केले गेले आहे. एमआरटीपी व सीआरझेड ऍक्ट प्रमाणे कारवाई करावी अन्यथा एमआरटीपी ऍक्ट कलम ५६(ए) अंतर्गत संबधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर मुंबई महापालिका प्रशासनाने या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व परवानग्या काम सुरू करण्य पूर्वीच घेण्यात आल्या होत्या असा दावा केला आहे.

भाजपने नोंदवलेला आक्षेप आणि प्रत्यक्षात मुख्यमंत्री यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते झालेले उदघाटन ही कुठे तरी या प्रकल्प कामाविषयी निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन उचललेले पाऊल होते का असा प्रश्न निर्माण होत आहे. निमंत्रण पत्रिकेवर रश्मी ठाकरे यांचे नसताना त्यांनी मुख्यमंत्री यांच्याऐवजी रश्मी ठाकरे यांना हे उदघाटन का करावे लागले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.