मराठी भाषेसाठी लढणाऱ्या आणि मराठी जनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्र सरकारने गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली. सध्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आंतर मंत्रालयीन स्तरावर विचारविनिमय सुरु असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्राकडून राज्यसभेत सांगण्यात आले आहे.
Inter-ministerial consideration underway to decide Marathi as classical language, positive decision soon: Govt in RS
Read @ANI Story | https://t.co/hzWKfjm2WV#RajyaSabha #Parliament pic.twitter.com/zAC8VzNxRQ
— ANI Digital (@ani_digital) February 3, 2022
मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा का नाही?
गुरूवारी राज्यसभेत मराठी भाषेच्या अभिजात दर्जासंदर्भात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सवाल उपस्थितीत केला आहे. यावेळी केंद्राकडे प्रश्नाची विचारणा करताना चतुर्वेदी म्हणाल्या, महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी आणि स्वतः राज्य सरकारने सातत्याने केंद्रापुढे ही मागणी मांडल्यानतंरही मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा का मिळालेला नाही? यावर विचारविनिमय सुरु असल्याचे उत्तर कायम केंद्राकडून देण्यात येतं पण अद्याप झाले का नाही?
(हेही वाचा – “…मुख्यमंत्री महाविकास आघाडीत आल्यानं बिघडले”)
लवकरच सकारात्मक निर्णय होणार
लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यावर आंतर मंत्रालयीन विचारविनिमिय सुरु आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल. केंद्राकडून सध्या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, असे उत्तर केंद्रीय सांस्कृतीक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी चतुर्वेदी यांना सांगितले.
महाराष्ट्र सरकारने सांस्कृतीक मंत्रालयाकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अर्ज केला आहे. देशात सध्या तामिळ, तेलूगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना सध्या अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रानं जे निकष लावले आहेत. त्यानुसार, संबंधित भाषेला 1500 ते 2 हजार वर्षांचा नोंदणीकृत इतिहास असावा. प्राचिन काळात संबंधित भाषेतील साहित्याबाबत पुरावे असावेत. तसेच संबंधित भाषेत मूळ साहित्यिक परंपरा असावी ती इतर बोली भाषेतून आलेली नसावी अशी अट आहे.
Join Our WhatsApp Community