देशात इलेक्ट्रिक हायवे निर्माण करणार!

81

सध्या पेट्रोल आणि डिजेलचे भाव गगना भिडले आहेत. तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाहनांमुळे दिवसेंदिवस प्रदूषण सुद्धा वाढत आहे. या सर्वातून सुटका होण्यासाठी देशात इलेक्ट्रिक हायवे बांधण्यात येणार असून आता बस आणि ट्रक इलेक्ट्रिक केबलवर चालतील, असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

( हेही वाचा : मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगर पुन्हा अलर्टवर )

इलेक्ट्रिक हायवे 

शहरीकरणात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण पडणार असून यामुळे इंधनाचा खर्च ही वाढत जाणार आहे. म्हणूनच प्रदूषण आणि इंधनावरील खर्च टाळण्यासाठी आता मोठ मोठ्या शहरातून वाहतूक करण्यासाठी इलेक्ट्रिक हायवे ही संकल्पना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी पुढे आणणार आहेत. इलेक्ट्रिक हायवेवर रोपद्वारे ट्रक आणि बस चालतील त्यासाठी राज्यपरिवहन महामार्गाकडून स्वतंत्र लाईन टाकण्यात येतील, 165 शहरात हा प्रयोग करण्यात येणार आहे. यामुळे इंधनाची ही बचत होईल. तसेच शहरांतर्गत दळणवळण करण्यासाठी नागरिकांना कमी खर्चात एअर कंडीशन बसमध्ये प्रवास करणे सोयीचे होणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. गडकरी यांनी याच बसमधून हॉटेल बालाजी सरोवर ते माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या घरापर्यंत प्रवास देखील केला. प्रिसिजन ग्रुपचे प्रमुख यतीन शाह, कार्यकारी संचालक करण शाह हे देखील यावेळी उपस्थित होते. गडकरी यांनी बसबद्दल संपूर्ण माहिती यावेळी जाणून घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.