हल्ली सगळीकडे एआय म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने काम करण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने कमी भांडवल लावूनही अत्यंत कमी वेळात जास्तीत जास्त काम पूर्ण करता येते.
हल्लीच मिळालेल्या माहितीनुसार असे कळले आहे की, ट्विटरचा मालक एलन मस्क याने xAI (एक्सएआय) नावाची एक नवीन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी लॉन्च केली आहे. एलन मस्क यांचं म्हणणं आहे की, ही कंपनी ब्रह्मांडाचं गूढ उलगडून काढण्यास खूप फायदेशीर ठरू शकते.
या नवीन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स xAI मध्ये काम करण्यासाठी जगातल्या सुप्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम करणारे लोक जे आधीपासूनच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे काम चांगल्या प्रकारे करत आहेत, अशा लोकांना निवडलं गेलं आहे. या नव्या xAI कंपनीत काम करण्यासाठी गूगल, मायक्रोसॉफ्ट, डीपमाईंड यांसारख्या मोठ्या कंपन्यांमधून काम करणारे काही खास लोक निवडलेले आहेत.
(हेही वाचा – महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाचे महत्वच कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न)
टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपन्यांचे सिईओ आणि ट्विटर या कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी ही xAI नावाची नवीन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी लॉन्च करत असल्याचे जाहीर केले. ही कंपनी संपूर्ण ब्रह्मांडाचं गूढ उलगडायला नक्कीच मदत करेल असं एलन मस्क यांचं म्हणणं आहे. आता बघायचं आहे की हजारो वर्षाआधी आपल्या ऋषीमुनींना झालेलं ज्ञान या कंपनीच्या आधारे उलगडू शकेल का!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community