रविवारी सकाळी आरेत पर्यावरणप्रेमींनी आयोजित केलेल्या आंदोलनाला माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देिली आणि पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांची भेट घेत आपल्या मुंबईची जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही, असे आश्वासन ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
दर रविवारी मेट्रो ३ कारशेडच्या जागेपासून जवळ आंदोलन
मेट्रो ३ कारशेडची उभारणी आरेतच होणार असल्याचे जाहीर होताच पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक आरेवासियांनी आता दर रविवारी मेट्रो ३ कारशेडच्या जागेपासून जवळ असलेल्या पिकनिक पॉइंटवर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या रविवारी अधिवेशनामुळे ठाकरे यांना आंदोलनात सहभागी होता आले नव्हते. याबाबतीत ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी
आम्हाला मेट्रो ३ कारशेडच्या उभारणीला विरोध नाही, परंतु आरेत होणा-या कारशेडला विरोध आहे. आरे विकासकामांपासून दूर ठेवा, अशी मागणी आरेतील मूळ आदिवासींची आहे.
(हेही वाचा – आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधिमंडळाची नोटीस)
आरेतील ८०८ एकर जागा जंगल
नव्या सरकारस्थापनेपासून दर रविवारी शांततामय मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून आरेतील मेट्रो कारशेडच्या उभारणीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला होता. रविवारी सकाळीच आदित्य ठाकरे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. आरे आपल्या मुंबई शहरातील विविधतेने नटलेले जंगल आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील ८०८ एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. कारशेड आरेतून बाहेर जायलाच हवी, अशी जाहीर भूमिका ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी बोलताना मांडली. माणसाचा लाभ आणि करुणेच्या अभावामुळे आपल्या शहरातील जैवविविधता नष्ट होता कामा नये, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community