वकिलांना न्यायालयातील दैनंदिन कामकाजात काळा कोट वापरण्यापासून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सूट देण्यात आली आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता अन्य सर्व न्यायालये, न्याधिकरणात हजर होताना १५ मार्च ते ३० जून दरम्यान वकिलांना काळा कोट घालणे अनिवार्य असणार नाही.
दरम्यान न्यायालयात वकिलांनी ड्रेसकोडचे पालन केले आहे किंवा नाही याची न्यायाधीश दखल घेत असतात. त्यामुळे वकीलदेखील ड्रेसकोडबाबत अतिशय दक्ष असतात. मात्र, यंदा मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या वातावरणात वकिलांचा पारंपरिक पोशाख परिधान करून काम करणे अवघड होते. या परिस्थितीचा विचार करून सिव्हिल मॅन्युअलच्या प्रकरण २२ मधील परिच्छेद क्रमांक ६३६ नुसार काळा कोट वापरण्यातून दरवर्षी सूट दिली जाते. त्यानुसार यंदाही वकिलांना काळ्या कोटपासून सूट देण्यात आली आहे. तसेच पुरुष आणि महिला वकिलांसाठी ड्रेस कोडही सांगण्यात आला आहे.
पुरुष वकिलांसाठी ड्रेस कोड काय असणार?
पांढरा शर्ट, काळी किंवा राखाडी रंगाची पँट, काळा टाय किंवा पांढरा बँड
महिला वकिलांसाठी ड्रेस कोड काय असणार?
पांढरी किंवा सौम्य रंगाची साडी, सलवार कुर्ता, अथवा काळी पँट व पांढऱ्या शर्टवर पांढरा बँड
(हेही वाचा – भूकंपाबाबत वैज्ञानिकाने केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी)