एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून अनेक मोठे बदल केले आणि निर्णयही घेतले तेव्हापासूनच ते चर्चेत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी मस्क यांनी पोल घेत नेटकऱ्यांना विचारले की, मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून (सीईओ) पायउतार व्हावे का? मी या मतदानाच्या निकालांचे पालन करीन. या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच बुधवारी त्यांनी आणखी एक ट्विट करत आपण ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट घातली असून एक मोठी घोषणा केली.
मस्क यांनी केली ही नवी घोषणा
ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा एलॉन मस्क यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. ट्विटरचं सीईओ पद सांभाळण्यासाठी पात्र असा मूर्ख व्यक्ती सापडताच की मी सीईओ पदाचा राजीनामा देईन! त्यानंतर, मी फक्त सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमसोबत करेल, असे एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
I will resign as CEO as soon as I find someone foolish enough to take the job! After that, I will just run the software & servers teams.
— Elon Musk (@elonmusk) December 21, 2022
मस्क यांनी पोल घेत नेटकऱ्यांना विचारले की, मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून (सीईओ) पायउतार व्हावे का? असा पोल प्रश्न विचारला होता. मस्क यांच्या या ट्विटरपोलवर एक कोटीहून अधिकांनी मतदान केले आहे. ज्यामध्ये 57 टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा देण्याचं समर्थनार्थ मतदान केले. मस्क यांनी ट्विटरवर एक नवीन पोल सुरू केला आहे. याच माध्यमातून त्यांनी हा प्रश्न थेट नेटकऱ्यांना विचारला आहे. लोक जी भूमिका घेतील त्याचे मी पालन करणार असल्याचे मस्क यांनी जाहीर केले आहे. मस्क यांनी 19 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी हे ट्विट केले आहे. तेव्हा पासूनच सोशल मिडियावर हे ट्विट प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे मस्क आता राजीनामा देणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community