RVM चा भाजपला होणार फायदा? या मशिनची कल्पना कशी सुचली ? जाणून घ्या सविस्तर

131

देशाच्या कोणत्याही भागात राहणा-या मतदारांना त्यांच्या मतदारसंघात होणा-या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. हे RVM च्या माध्यमातून शक्य होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे RVM आहे तरी काय? याचा राजकीय पक्षांना कसा फायदा होणार? तसेच, या मशीनची कल्पना कशी सुचली? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

RVM आहे तरी काय?

RVM म्हणजे रिमोट व्होटिंग मशीन. 29 डिसेंबर 2022 रोजी निवडणूक आयोगाने याबाबत मीडियाला सांगितले होते. या मशीनच्या मदतीने स्थलांतरित नागरिक त्यांच्या मूळ राज्यात न येता मतदान करु शकतात. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर तुमचा जन्म कानपूर, उत्तर प्रदेशमध्ये झाला असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला केरळ किंवा देशातील इतर कोणत्याही राज्यात राहावे लागत असेल. तर अशा स्थितीत, मतदानाच्या वेळी तुम्हाला तुमच्या राज्यात न जाता मतदान करता येऊ शकते, त्यासाठी मतदाराला ज्या शहरात तो राहतो तिथे बनवलेल्या रिमोट मतदानाच्या ठिकाणी जावे लागेल.

रिमोट व्होटिंग मशीनची कल्पना कशी सुचली?

2016 मध्ये निवडणूक आयोगाकडून स्थलांतरित मतदारांबाबत अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये अधिक गोष्टींचा विचार करण्यात आला. निवडणूक आयोगाने केलेल्या अभ्यासानुसार, इंटरनेट मतदान, प्राॅक्सी मतदान, लवकर मतदान आणि पोस्टल बॅलेट मतदानाची शिफारस केली. परंतु या सर्व पर्यायांमध्ये गोपनियता राखता येत नव्हती. तसेच, शिक्षण कमी असलेल्या मतदारांसाठी या कल्पना फायदेशीर नव्हत्या. यानंतर निवडणूक आयोगाने RVM प्रणालीद्वारे तांत्रिक पर्याय शोधला.

( हेही वाचा: महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी नाना पटोलेंना हटवा, काँग्रेसच्या नेत्याची मागणी )

‘असे’ करता येणार RVM द्वारे मतदान

मतदानाची ही प्रक्रिया 4 टप्प्यांत

  • बूथवरील पीठासीन अधिकारी ओळखपत्राची पडताळणी केल्यानंतर मतदारांचे मतदारसंघ कार्ड स्कॅन करतील.
  • यानंतर, मतदाराच्या मतदारसंघाचे नाव सार्वजनिक पडताळणी केल्यानंतर मतदारांचे मतदारसंघ कार्ड स्कॅन करतील.
  • मतदार त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करेल आणि हे मत मतदार संघ क्रमांक, राज्य संहिता आणि उमेदवार क्रमांकासह नोंदवले जाईल.
  • VVPAT स्लिपमध्ये उमेदवाराचे नाव, चिन्ह आणि अनुक्रमांक आणि राज्य कोड आणि मतदार संघ कोडदेखील असतो.

भाजपला RVM चा फायदा होणार?

ज्याठिकाणी जास्त मतदान होते त्याठिकाणी कामाच्यादृष्टीने एखाद्या पक्षाने केलेल्या कामावरुन मतदार मतदान करत असतात. 2009 च्या तुलनेने 2014 मध्ये 8 टक्के मतदान अधिक झाले. Association of Democratic reforms चे संस्थापक जगदीप छोकर म्हणाले की, रिमोट व्होटिंग प्रणाली लागू झाल्याने मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल, पण त्याचा फायदा कोणाला होईल, हे सांगणे कठीण आहे.

2019 च्या निवडणुकीत 91 कोटी मतदार होते. त्यातील 30 कोटी लोकांनी मतदान केले नाही. त्यामुळे RVM च्या मदतीने या 30 कोटी रिमोट मतदारांची भर पडणार आहे. परिणामी,  मतदारसंघात आणि मतदारसंघाबाहेर जोरदार प्रचार करु शकणा-या मोठ्या पक्षांना फायदा होणार आहे. साधनसंपत्तीच्या बाबतीत भाजप सध्या आघाडीवर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.