अमेरिकेतील ‘माऊंट रशमोर’ डोंगरात तेथील माजी राष्ट्राध्यक्षांची शिल्पे कोरली आहेत. त्याच धर्तीवर आता राज्यातील नामांकित व्यक्तींची शिल्पे कोरण्याची योजना राज्य रस्ते विकास महामंडळाकडे प्रस्तावाधीन आहे. त्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.
देशाच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणा-या महान व्यक्तींना मानवंदना देण्याच्या हेतूने डोंगरांवर त्यांची शिल्पे कोरण्याची योजना आखण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींच्या कार्याबाबत माहिती देण्यासाठी पर्वतरांगांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा उद्देश यामागे आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. याठिकाणी पर्यटकांसाठी उद्यान, संग्रहालय, दर्शक गॅलरी, सेल्फी पाॅईंट्स अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी माहिती एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिका-याने दिली.
( हेही वाचा संजय राऊतांनी अशा पोकळ धमक्या दुस-यांना द्याव्यात; खासदार श्रीकांत शिंदे कडाडले )
रोजगाराच्या संधी
- या प्रकल्पाच्या अभ्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगांची निवड करण्यात आली आहे. पर्यटन स्थळे आणि मुलभूत पायाभूत सुविधांची उपलब्धता पाहता, सह्याद्री आणि इतर पर्वतरांगांमध्ये पर्यटन व्यवसाय वाढीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.
- या नव्या प्रकल्पामुळे पर्वतरांगांमधील रहिवाशांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.