आपण लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रक लॉंच करणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात बोलताना सांगितले. याप्रसंगी गडकरी म्हणाले की, इथेनॉल आणि मिथेनॉल या पर्यायी इंधनानंतर आता इलेक्ट्रिक वाहनं हे भविष्य असणार आहे. मला आठवतं तीन वर्षांपूर्वी मी जेव्हा ई व्हेईकल्स वापरासंबंधी बोललो होतो तेव्हा लोकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण आता पाहा ई-व्हेईकल्सला मोठा प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळे आता इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसनंतर लवकरच मी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रकही लॉंच करणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी यावेळी केली.
( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांचा ऑनड्युटी अपघात झाल्यास, पुन्हा रूजू होईपर्यंत पूर्ण पगार मिळणार!)
पर्यायी इंधनाचा वापर करणे फायदेशीर
इंधनाची आयात कमी करण्यासाठी येणाऱ्या काळात पर्यायी इंधनाचा वापर करणे फायदेशीर ठरेल. यावर इथेनॉल हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आता ऊसाचा रस, शुगरकेन सिरपपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळाली आहे. शेतकरी व साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. इथेनॉलप्रमाणेच ग्रीन हायड्रोजन हेदेखील आपले भविष्य ठरू शकते. कारखान्यांना ग्रीन हायड्रोजन निर्मितीतूनही उत्पन्न मिळू शकते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने या सर्व पर्यायांचा विचार करून ते लोकांसमोर आणावेत असेही गडकरी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community