1990 चा नरसंहार पुन्हा होणार? काश्मिरी पंडितांना भीती; खोरे सोडण्याचा इशारा

141

जम्मू -काश्मीरमध्ये मागच्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांचे हत्यासत्र सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 1990 चा नरसंहार होणार अशी भीती काश्मिरी पंडितांना सतावत आहे. त्यामुळे आता जीव वाचवण्यासाठी काश्मीर खोरे सोडण्याचा इशारा काश्मिरी पंडितांनी दिला आहे. मंगळवारी कुलगाममध्ये रजनी बाला या शिक्षिका असलेल्या काश्मिरी पंडितच्या हत्येनंतर तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत.

काश्मिरी पंडितांचा इशारा 

काश्मिरी पंडितांनी रस्त्यावर उतरत आम्हाला न्याय द्या अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, प्रशासनाने आगामी 24 तासांत सुरक्षित स्थळी स्थलांतर  न केल्यास काश्मीर खोरे सोडण्याचा इशाराही काश्मिरी पंडितांनी दिला. काश्मिरी पंडितांच्या इशा-यानंतर जम्मू- काश्मीर प्रशासनाने पंडितांना संक्रमण शिबिरात ठेवले आहे.

( हेही वाचा: पाकिटात ११ किंवा १००१ असेच का दिले जातात? ही आहेत त्या वरच्या 1 रुपयामागची कारणे )

काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण

कुलगाम जिल्ह्यातील गोपालपुरा भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या 20 दिवसांत दोन हत्या झाल्याने, काश्मिरी पंडितांमध्ये संताप, भीतीचे वातावरण आहे. काश्मिरी पंडित पलायनाची तयारी करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.