औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी सर्वच प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना कारवाई करणार असल्याचे पत्र पाठवले आहे, कारणही तसेच आहे. यासंदर्भात औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी एक पत्र लिहिले असून औरंगाबाद विभागीय मंडळामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. प्राचार्य, मुख्याध्यापकांनी हे काम शिक्षकांडून मुदतीत करुन घेतले नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा बोर्डाने दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावी परीक्षेचा निकाल रखडणार का अशी शक्यता वर्तविली जात आहे.
असे लिहिले औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी पत्र
औरंगाबाद मंडळाच्या दृष्टीने ही खेदाची बाब
मिळालेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल रोजी राज्य महामंडळाच्या अध्यक्षांकडून ऑनलाईन मीटिंमध्ये दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीबाबत आढावा घेण्यात आला. या आढाव्यात औरंगाबाद विभाग वगळता उर्वरित सर्वच मंडळांचे उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज वेळापत्रकानुसार 90 टक्के झाल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद मंडळाच्या दृष्टीने ही बाब खेदाची असल्याचे अध्यक्षांनी सांगितले आहे.
(हेही वाचा -पुण्यात ऑनलाईन आलेल्या ९२ तलवारी जप्त; चौघांना अटक)
निकाल उशिरा लागण्याची भीती!
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुशार, 10 जूनपूर्वी दहावीचा आणि 15 जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणे अपेक्षित आहे. असे असले तरी औरंगाबाद विभागीय मंडळाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज विचारात घेता, निकाल उशिरा लागण्याची भीती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. यासह विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावरील शाळांचे शिक्षक संबंधित शाळांचे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला विलंब करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Join Our WhatsApp Community