२० नोव्हेंबर १९८५ साली सुरु झाले होते Windows 1.0 !

37
२० नोव्हेंबर १९८५ साली सुरु झाले होते Windows 1.0 !

Windows 1.0 हे मायक्रोसॉफ्ट विंडोजचं पहिलं मोठं व्हर्जन आहे. विंडोज म्हणजे मायक्रोसॉफ्टने तयार केलेल्या संगणकांसाठी ग्राफिकल ऑपरेटिंग सिस्टमची एक चेन आहे. Windows 1.0 हे युनायटेड स्टेट्समध्ये २० नोव्हेंबर १९८५ साली पहिल्यांदा सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर १९८६ साली Windows 1.02 हे सुरु करण्यात आलं.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि Windows 1.0 चे प्रमुख बिल गेट्स यांनी १९८२ साली COMDEX येथे Visi On या समान सॉफ्टवेअर सूटचं प्रात्यक्षिक पाहिलं. त्यानंतर या सॉफ्टवेअरचा विकास करण्यात आला. हा सॉफ्टवेअर कसा ऑपरेट केला जातो. हे नोव्हेंबर १९८३ साली लोकांसमोर दाखवलं गेलं होतं.

(हेही वाचा – Bitcoin Scam प्रकरणातील ‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचाच; अजित पवारांनी केली पुष्टी)

तरी दोन वर्षांनंतर ते सुरु करण्यात आलं. Windows 1.0 MS-DOS वर चालतं. MS-DOS हा एक एक्झिक्युटिव्ह म्हणून ओळखला जाणारा १६-बिट शेल प्रोग्राम आहे. या शेल प्रोग्राममुळे विंडोजसाठी डिझाइन केलेले ग्राफिकल प्रोग्राम आणि विद्यमान MS-DOS सॉफ्टवेअर चालवता येतात. त्यात मल्टीटास्किंग, माउसचा वापर, कॅल्क्युलेटर, पेंट आणि नोटपॅड यांसारखे वेगवेगळे अंगभूत प्रोग्राम समाविष्ट होते.

ऑपरेटिंग शेल विंडोज ओव्हरलॅप होऊ देत नाही. त्याऐवजी विंडोज टाइल केल्या जातात. पुढे विंडोजच्या अनेक चेन तयार करण्यात आल्या. नवीन हार्डवेअर आणि इतर अनेक भाषा वापरण्यासाठी त्या समाविष्ट केल्या गेल्या. मायक्रोसॉफ्टच्या सुरुवातीच्या प्रोजेक्ट्सना सकारात्मक प्रतिसाद आणि हार्डवेअर-सॉफ्टवेअर निर्मात्यांकडून समर्थन देखील मिळालं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.