कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या भारतावर तिसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ओमायक्रॉनमुळे रविवारी सर्वोच्च न्यायालय सर्व प्रत्यक्ष हजर राहून सुनावणीस स्थगिती आणण्यात आली आहे. यापुढे दोन आठवड्यांसाठी आभासी सुनावणी करणार आहे.
पुढील दोन आठवड्यांसाठी आभासी सुनावणी
सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने रविवारी संध्याकाळी एक परिपत्रक जारी करून निर्णय जाहीर केला आहे. त्यात नमूद केले आहे की, शारीरिक सुनावणीसाठी (संकरित सुनावणी) पूर्वीचे परिपत्रक, सध्याची सुनावणीची कार्यपद्धत बंद करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने हे परिपत्रक जारी केले आहे.
( हेही वाचा : मुंबई महापालिका सज्ज! आजपासून 9 केंद्रांवर बच्चे कंपनीला मिळणार कोरोना लस )
सदस्य आणि सर्व संबंधितांच्या माहितीसाठी सूचित करण्यात येते की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांची संख्या लक्षात घेऊन, भौतिक सुनावणीसाठी (हायब्रिड मोड) 7 ऑक्टोबर 2021 रोजी अधिसूचित केलेल्या सुधारित मानक कार्यप्रणाली सध्या काही काळासाठी निलंबित करून पुढील दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी न्यायालयांसमोरील सर्व सुनावणी केवळ व्हर्च्युअल मोडद्वारे घेण्यात येतील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय मार्च 2020 पासून महामारीमुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणांची सुनावणी करत आहे. अनेक वकिलांनी मागणी केल्यानंतर 7 ऑक्टोबर 2021 पासून शारीरिक सुनावणीला पुन्हा एकदा सुरूवात करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community