नंबर सेव्ह न करताही करु शकता व्हाॅट्सअ‍ॅप मेसेज, ही आहे ट्रिक

सध्या सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. कोणाला मेसेज करायचा असो, कोणाशीही गप्पा मारायच्या असोत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात व्हाॅट्सअॅपने तर आपल्या आयुष्यात क्रांतीकारक बदल केले आहेत.

व्हाॅट्सअॅप नाही अशी व्यक्ती अगदी दुर्मिळच. या अॅपमध्ये वेळोवेळी अपग्रेडेशन होत असते. आधी फक्त संवादासाठी वापरले जाणारे व्हाॅट्सअॅप आता व्हिडीओ काॅन्फरन्सपर्यंत पोहोचले आहे. तसेच, कामासाठी आपल्याला अनेक अनोळखी व्यक्तींशी संपर्क करावा लागतो. पण यांचा नंबर सेव्ह केल्याशिवाय आपल्याला व्हाॅट्सअॅप काॅल करता येत नाही.

काही जणांना अनोळखी नंबर सेव्ह करण्यात काहीही प्राॅब्लेम नसतो. पण काही जणांना अनोळखी, अपरिचित व्यक्तींनी आपले डिपी, स्टेटस पाहिलेले आवडत नाहीत. तर अशावेळी नंबर सेव्ह न करताही मेसेज पाठवू शकतो का? तर याचे उत्तर आहे हो. मात्र यासाठी तुम्हाला व्हाॅट्सअॅपची एक ट्रिक वापरायची आहे. काय आहे ही ट्रिक?

गुगल अनेक गोष्टी क्षणात साॅल्व्ह करते. यासाठीही गुगलची मदत घेऊ शकतो, कसे ते पाहूया.

( हेही वाचा: पेट्रोल वाचवण्याच्या या भन्नाट टिप्स तुम्हाला माहिती आहेत का? )

ही आहे ट्रिक

सगळ्यात आधी गुगल ओपन करायचे आणि त्यावर सर्चमध्ये wa.me/ असे टाईप करुन पुढे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाइप केला, की तुम्ही त्या व्यक्तीच्या व्हाॅट्सअॅप खिडकीत थेट जाता. ईथे जाऊन जो काही संदेश पाठवायचा तो पाठवू शकता, नंबर सेव्ह न करता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here