PF मधून विनाकारण पैसे काढत असाल, तर होऊ शकते लाखोंचे नुकसान! कसे ते वाचा…

सरकारने ईपीएफ (EPF) किंवा पीएफ (PF) मधून पैसे काढण्याची Online सुविधा दिली आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक कोणत्याही मोठ्या गरजेशिवाय त्यांच्या पीएफ (Provident Fund) मधून पैसे काढतात. यामुळे त्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या एकरकमी पैशांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे आवश्यक असेल तरच PF मधून पैसे काढणे चांगले अन्यथा लाखोंचा फटका बसू शकतो जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती…

( हेही वाचा : SBI बॅंकेने ग्राहकांना दिल्या या ५ टिप्स! लहानशी चूकही करू शकते तुमचे बॅंक खाते रिकामे, जाणून घ्या… )

तरच काढा पैसे

अत्यंत तातडीची गरज नाही तोपर्यंत PF चे पैसे काढू नका. त्यावर ८.१ टक्के दराने व्याज मिळत आहे. पीएफमधून जितकी मोठी रक्कम काढली जाईल तितका मोठा परिणाम निवृत्तीवेळी मिळणाऱ्या पैशांवर होईल. शक्यतो पीएफच्या पैशांना हात लावणे टाळावे. असे अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

असा बसतो फटका

किती पैसे काढल्यानंतर २० वर्षानंतर किती रुपये कमी मिळतील ३० वर्षांनी किती रुपये कमी मिळतील
१० हजार ५० हजार ०१.१२ लाख
२० हजार १ लाख ०२.२५ लाख
५० हजार २.५१ लाख ०५.६३ लाख
१ लाख ५.०२ लाख ११.२६ लाख
२ लाख १०.०५ लाख २२.५३ लाख
३ लाख १५.०७ लाख ३३.७८ लाख

 

PF किती कापला जातो ? 

पगारदारांना त्यांच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम PF खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here