एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेच्या हाती स्टेअरिंग

167
एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेच्या हाती स्टेअरिंग
एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेच्या हाती स्टेअरिंग

राज्यातील सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एसटीच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासात आता पहिल्यांदा एका महिला ड्रायव्हरने बस चालविली आहे. याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या ऐतिहासिक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान एसटी सुरू झाल्याच्या तब्बल ७५ वर्षांनी महिलेच्या हातात एसटीचे स्टेअरिंग पाहून लालपरीत महिला क्रांती होत असल्याचे म्हटले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यानी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. चाकणकर यांनी महिला चालकाचा एसटी चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत त्या महिलेचे अभिनंदन केले आहे. “नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची… आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे.

(हेही वाचा – Rain : ये रे ये रे पावसा! आश्चर्य, या गावात पावसाचा एक थेंब सुद्धा पडत नाही)

२०१९मध्ये एसटीच्या सरळ सेवा भरतीसाठी अहमदनगर विभागात महिलांसाठी नऊ जागा होत्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या चार पैकी एक महिला उमेदवार उपस्थित राहिल्या नाहीत. तर तीन महिलांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. दोन महिला कर्मचाऱ्यांना शनिवारी पदस्थापना देण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.