CRPF कॅम्पवर बॉम्ब फेकणाऱ्या बुरखाधारी महिलेची पटली ओळख!

127

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातील सीआरपीएफ नाक्यावर बुरखा घातलेल्या एका महिलेने पेट्रोल बॉम्ब फेकला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेतील संशयित महिलेची ओळख पटल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे.

बुरखाधारी महिला लष्कर-ए-तोयबाची ग्राउंड वर्कर

दरम्यान या बुरखाधारी महिलेची ओळख पटली असून आता तिला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली असून लवकरच तिला अटक केली जाईल, असा दावा काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी केला. सीआरपीएफ बंकरवर हल्ला करणारी ही महिला लष्कर-ए-तोयबाची ग्राउंड वर्कर आहे, तिच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सोशल मीडियावर या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बुरखा घातलेला एक दहशतवादी सीआरपीएफच्या चौकीवर बॉम्ब फेकताना दिसत आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मंगळवारी सायंकाळी ७.१२ वाजता ही घटना घडली.

(हेही वाचा – ‘या’ प्रकरणी मुंबई मेट्रोला उच्च न्यायालयाचा दिलासा)

बघा व्हिडीओ

बाॅम्ब फेकून काढला पळ

या व्हिडीओमध्ये बुरखा घातलेला अज्ञात दहशतवादी रस्त्यावर आला. त्याने आपल्या बॅगेतून बॉम्ब काढला आणि तो सीआरपीएफ कॅम्पवर फेकला. बॉम्ब फेकल्यानंतर दहशतवाद्याने घटनास्थळावरून पळ काढला. जेव्हा दहशतवाद्याने कॅम्पवर बॉम्ब फेकला तेव्हा काही दुचाकीही तिथून जाताना दिसल्या. तेथे उपस्थित लोकांनी पेट्रोल बॉम्ब टाकल्याने लागलेली आग पाण्याने विझवली, मात्र तोपर्यंत कॅम्प पूर्णपणे जळून खाक झाला होता. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. सुरक्षा दल दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.