बापरे! महिला पोलिसच द्यायची थेट हत्येची सुपारी

मुंबईतील पूर्व उपनगरातील एका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार असलेल्या शिवाजी सानप यांची १५ ऑगस्ट रोजी अपघात घडवून हत्या करण्यात आली होती.

पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्यानंतर तिने मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या हत्येची सुपारी दिली होती. मात्र पोलिस कर्मचा-याच्या हत्येप्रकरणी सुपारीबाज पकडले गेल्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या पोलिस अधिकारी यांचे प्राण वाचले. पनवेल येथे घडलेल्या मुंबई पोलिस दलातील हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिला पोलिस शिपाई असलेल्या आरोपीने पनवेल पोलिसांना ही धक्कादायक कबुली दिली आहे.

हवालदाराची अपघात घडवून हत्या

मुंबईतील पूर्व उपनगरातील एका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार असलेल्या शिवाजी सानप यांची १५ ऑगस्ट रोजी अपघात घडवून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आणि या गुन्ह्याची उकल सप्टेंबर महिन्यात करण्यात आली. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी दोन सुपारीबाज तरुण आणि मुंबई पोलिस दलातील सशस्त्र विभागात कार्यरत असलेली महिला पोलिस शिपाई शीतल पानसरे (२९) ला अटक करण्यात आली होती.

(हेही वाचा : फक्त मोदी नामाचा जप करून निवडणुका जिंकण्याचा काळ संपला!)

छळ करायची म्हणून हत्या

सानप हा आपला सतत छळ करीत असल्यामुळे आपण या हत्येची सुपारी इमारतीतील वॉचमनच्या मुलाला दिली होती, तसेच सानप याला पाठिशी घालणाऱ्या संबंधित पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक याला देखील संपवायचे होते, या अधिकाऱ्याची देखील हत्येसाठी सुपारी देण्यात आली होती, अशी कबुली शीतल पानसरे हिने पनवेल शहर पोलिसांना दिली होती. तिच्या या धक्कादायक कबुलीमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा जबाब नोंदवून घेण्यासाठी समन्स पाठवले असून लवकरच या वरिष्ठ पोलिस निरीक्षक जबाब देण्यासाठी पनवेल पोलिस ठाण्यात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here