राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांवरील घटना लक्षात घेता आता राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यामुळे यावर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. आता पोलिस खात्यातील निवृत्त अधिकारी हेदेखील राज्य सरकारला सूचना करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या सूचनांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
पोलिस दलात महिला पोलिस मित्राचा समावेश करावा!
नुकतेच साकीनाका येथे एका महिलेवर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर ठाण्यात घटना घडली. त्यामुळे हा विषय अधिक चिंतेचा बनला आहे. त्यावर माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ट्विटरद्वारे राज्य सरकारला यावर महत्वाची सूचना केली आहे. त्यामध्ये दीक्षित यांनी, ठाण्यातील सामूहिक बलात्कार आणि अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटना पोलिस यंत्रणेत महिला पोलिस मित्राला सामील करण्याची गरज अधोरेखित करतात. जेणेकरून महिलांमध्ये तक्रार निर्माण करण्यासाठी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी पुढे येण्यासाठी विश्वास निर्माण होईल. २४ तासांत आरोपपत्र दाखल करणे अत्यावश्यक आहे, असेही दीक्षित यांनी म्हटले आहे.
Gang rape in Thane & increasing incidents of molestation of young girls underlines the need to involve women police Mitra to create trust in women to come forward to complain & maintain dialogue with parents. Filing chargesheet in 24 hrs is imperative @Dwalsepatil @CPThanet
— Praveen Dixit, (@PraveenDixitIPS) September 25, 2021
(हेही वाचा : साता समुद्रापलीकडे पोहचले बाळू लोखंडे? काय आहे भानगड?)
पोलिस दलातील सध्याच्या व्यवस्थेत बदल अपेक्षित!
याचा आता राज्य सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी यावर उत्तरादाखल म्हटले की, पोलीस दलात निर्भया पथक यांच्याकडून व्हाट्स अप ग्रुप बनवण्यात आला आहे. त्यात सर्व घटकांतील महिला सहभागी होऊ शकतात. तसेच महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी ह्या शाळकरी मुली आणि पालकांसाठी चौक सभा घेतात, झूम मिटिंग घेतात. अडचणीत सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, असेच धर्माधिकारी म्हणाले. मात्र पोलिसांचे प्रयत्न सुरु असले दुर्दैवाने महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, असे दिसत आहे, त्यामुळे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासारख्या अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनांचा विचार करून त्यावर अंमलबजावणी करावी लागणार आहे.
Join Our WhatsApp Community