“मुलगी पळून गेली तर, आईच जबाबदार”

166

मुली कोणत्या मुलाशी बोलतात? काय बोलतात, कुठे जातात यावर घरच्यांचं लक्ष असायला हवं. तसेच जर घरातून मुली पळून गेल्या तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आईची आहे. मुली वाया आईमुळेच जातात त्यासाठी आईने मुलीला दिलेली अती सूटच जबाबदार आहे,असं वादग्रस्त विधान महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. आता त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरावरुन टीका होत आहे.

म्हणून मुली पळून जातात 

अलिगढसह राज्यातील अनेक भागात बलात्काराच्या घटनांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मीना कुमारी म्हणाल्या की, समाजाने आपल्या मुली कुठे जात आहेत, हे पाहायला हवे.  मी सगळ्यांना सांगते की, मुली मोबाईलवर बोलत राहतात आणि प्रकरण एवढे पुढे जाते की मुली त्या मुलासोबत पळून जातात. असेही मीना कुमारी पुढे म्हणाल्या.

…तर आईचं जबाबदार

आपल्या मुली कुठे जातात ते पाहावे आणि कोणाच्या सोबत बसतात त्याची माहिती घ्यावी. तसेच मुलीचा मोबाईलही घरच्यांनी चेक करावा. असही मीना कुमारी यावेळी म्हणाल्या. मुली मोबाईलवर बोलत राहतात आणि मग प्रकरण इथवर पोहोचतं की त्या संबंधीत मुलाचा हात पकडून सर्रास पळून जातात. तसेच मुलींच्या हातात मोबाईल देऊ नका आणि जर देणारच असाल तर मुलींवर कडक नजर ठेवा. मुलीच्या हातात मोबाईल दिल्याने त्या मोबाईलचा अती वापर करतात आणि त्यामुळे बलात्कार सारखे प्रकार वाढले आहेत. आपल्या मुलींवर त्यांच्या आईंनी नजर ठेवायला हवी, आईंच्या निष्काळजीपणामुळेच मुलींवरच्या अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 (हेही वाचा: पोलिसांच्या रखडलेल्या पदोन्नती मिळाला अखेर मुहूर्त, 175 अधिकाऱ्यांची बढती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.