Women’s Day 2023: महिला दिनानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनने केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीतर्फे महिला दिनानिमित्त यंदा पहिल्यांदाच आंतर क्लब महिला क्रिकेट लीगचे आयोजन 8 मार्चपासून करण्यात येत आहे. महिला क्रिकेट लीगमध्ये 52 क्लब सहभागी झाले असून 780 महिला खेळाडूंंना स्पर्धेमधून क्रिकेटचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेची सुरुवात मांडवी मुस्लिम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध फोर्ट यंगस्टर्स या दोन संघांदरम्यानच्या समान्यापासून होणार आहे. सलामीचा सामना महिला दिनी म्हणजे 8 मार्चला सकाळी 9 वाजता क्राॅस मैदान येथे सुरु करण्यात आला आहे.

या सामन्याला बीसीसीआयच्या सदस्या सुलक्षणा नाईक आणि महिला टीम इंडियाची मुंबईकर खेळाडू जेमिमा राॅड्रिग्ज उपस्थित राहणार आहोत. हा सामना महिला पंच आणि महिला गुणलेखक यांच्या नियंत्रणाखाली होईल.

( हेही वाचा: International Women’s Day 2023: महिला जागतिक दिनानिमित्त गूगलचं खास डूडल )

‘हे’ संघ सहभागी 

MCA महिला क्रिकेट लीगमध्ये 52 महिला संघ 13 गटवारीमध्ये साखळी सामन्यांसाठी विभागले आहेत. साखळी सामन्यांमधून गट विजेता एकच संघ बाद फेरीत प्रवेश करणार असल्यामुळे प्रत्येक गटामधील सामने चुरशीचे होतील. नवरोज क्रिकेट क्लब वि.पी.जे हिंदू जिमखाना, स्पोर्ट्स प्रमोशन ग्रूप मुंबई वि. पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन, आवर्स क्रिकेट क्लब वि. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, नॅशनल क्रिकेट क्लब विरुद्ध स्पोर्टिंग युनियन क्लब, राजावाडी क्रिकेट क्लब वि. प्रभू जाॅली यंग क्रिकेटर्स, पय्याने स्पोर्ट्स क्लब विरुद्ध माटुंगा जिमखाना, स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे विरुद्ध दादर पारसी काॅलनी स्पोर्टिंग क्लब, ग्लोरिअस क्रिकेट क्लब वि. डाॅक्टर डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, एम.आय. जी. क्रिकेट क्लब वि. वरळी स्पोर्ट्स क्लब, मुंबई पोलीस जिमखाना वि. जे भाटीया स्पोर्ट्स क्लब इत्यादी लढती बुधवारी मुंबईतील 13 क्रिकेट खेळपट्ट्यांवर खेळवल्या जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here