Women’s Day 2024 : का साजरा केला जातो जागतिक महिला दिन

महिलांच्या कर्तृत्वाला वंदन करण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी ८ मार्च रोजी महिला दिन जगभरात साजरा केला जातो.

281
Women's Day 2024 : का साजरा केला जातो जागतिक महिला दिन

महिला दिन – महिलांचा सन्मान करण्याचा दिवस. याचा अर्थ एकाच दिवशी महिलांचा सन्मान करावा असा नसून हा एक उत्सव आहे. आजची महिला फक्त घर सांभाळत नाही, तर कार्यालयही सांभाळते आणि समाजातही मोलाचा वाटा उचलते. महिलांच्या कर्तृत्वाला वंदन करण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी ८ मार्च रोजी महिला दिन (Women’s Day 2024) जगभरात साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया हा दिवस का साजरा केला जातो? (Women’s Day 2024)

१९०८ मध्ये, न्यूयॉर्क शहरातील कपड्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या सर्व महिलांनी संप केला. कमी कामाचे तास, चांगले वेतन आणि सुधारित कारखान्याची परिस्थिती या मागण्यांसाठी हा संप होता. परिणामी, १९०९ मध्ये अमेरिकेच्या समाजवादी पक्षाने या संपाला सहकार्य केले आणि त्यानंतर २८ फेब्रुवारी हा महिला दिन (Women’s Day 2024) म्हणून साजरा केला गेला. (Women’s Day 2024)

कोपनहेगनच्या आंतरराष्ट्रीय समाजवादी पक्षाने १९१० मध्ये महिला दिनाची स्थापना केली. यानंतर १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये रॅली काढण्यात आली ज्यात १० लाखांहून अधिक महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. या रॅलीचा प्राथमिक उद्देश म्हणजे मतदानाचा अधिकार, सार्वजनिक पद मिळवण्याचा अधिकार, कामाचा अधिकार, व्यावसायिक प्रशिक्षण आणि नोकरीतील भेदभाव संपुष्टात आणणे यासारख्या महिलांच्या हक्कांची मागणी करणे हा होता. १९१७ मध्ये, रशियातील काही महिलांनी या दिवशी ‘ब्रेड अँड पीस’ अर्थात अन्न मिळवण्यासाठी आणि निरंकुश राजवट संपवण्यासाठी संप केला होता. परिणामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. (Women’s Day 2024)

(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : ‘क्रिकेटपटूशी लग्न करणं म्हणजे काय हे पत्नीला ठाऊकच नव्हतं,’ असं अश्विन का म्हणाला?)

ही आहे महिला दिन २०२४ ची थीम

रशियामध्ये ’ब्रेड अँड पीस’ संपामुळे, २८ फेब्रुवारी रोजी महिला दिन साजरा केला जाऊ लागला. १९१० च्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, जर्मन क्रांतिकारकांनी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जावा असा प्रस्ताव मांडला. तेव्हापासून, विविध देशांमध्ये ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. (Women’s Day 2024)

महिला दिन २०२४ (Women’s Day 2024) ची थीम आहे inspire inclusion. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात महिला असल्या पाहिजेत, यासाठी ही थीम ठेवण्यात आली आहे. महिलांच्या अधिकाराचा सन्मान करणे, महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा अधिकार देणे, त्यांना उत्तेजना देणे, यासाथी हा दिवस साजरा केला जातो. महिलांवर होणार्‍या अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांना मान दिला जातो. तुम्ही यंदाच्या महिला दिनाला काय विशेष करणार आहात? (Women’s Day 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.