मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना, 50 फूट उंचीवरुन पडून कामगाराचा मृत्यू

136

पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना, 50 फूट उंचीवरुन पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ ही दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. मूलचंद्रकुमार सीताराम असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद

कोथरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ मेट्रो कारशेडचे काम सुरु होते. त्याठिकाणी इतर कामगारांबरोबर मूलचंद्रकुमार सीताराम कार्यरत होते. त्यावेळी 50 फूटवरुन खाली पडल्याने, ते जखमी झाले. मूलचंद्रकुमार यांनी सुरक्षाविषयक साहित्यही घातले होते. रात्री तातडीने त्यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

( हेही वाचा: राज्यात गुरुवारपर्यंत पूर्वमोसमी पावसाची शक्यता )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.