जागतिक एड्स दिन (World AIDS Day) दरवर्षी १ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. ‘अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम’ (Acquired Immunodeficiency Syndrome) म्हणजेच एड्स (AIDS). हा रोग एचआयव्ही (HIV Virus) संसर्गामुळे पसरतो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना एड्सबद्दल जागरुक करणे आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना प्रोत्साहन करुन त्यांना जगण्यास प्रवृत्त करणे. (World AIDS Day 2023)
WHO ने सर्वप्रथम १९८८ मध्ये जागतिक एड्स दिनाची (World AIDS Day) सुरुवात केली. याद्वारे संयुक्त राष्ट्राच्या एजन्सी आणि अनेक देशांची सरकारे एकत्रतितपणे एड्स (AIDS) संबंधित एक थीम निश्चित करतात आणि दरवर्षी विशिष्ट थीम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. थोडक्यात लोकांना जागरुक करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. (World AIDS Day 2023)
“Let Communities Lead” ही या वर्षीच्या जागतिक एड्स दिनाची (World AIDS Day) थीम आहे. एड्सने बाधित असलेल्या लोकांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणे हा उद्देश आहे. याचा अर्थ एड्सने (AIDS) बाधित लोक आवाज उठवू शकतील आणि आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करु शकतील. एड्स (AIDS) बाधित लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि समान रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात. (World AIDS Day 2023)
(हेही वाचा – Mumbai : चेंबूरमधील हॉटेल ईस्टर्न प्लाझावर महानगरपालिकेचा हातोडा)
या आजारावर अजूनही उपचार समोर आलेले नाहीत. त्यामुळे काळजी घेणे हाच प्रतिबंधनाचा महत्वाचा मार्ग ठरेल.
- इतर व्यक्तींनी वापरलेली इंजेक्शन्स आणि सुया परत वापरु नका.
- एड्सची लागण झालेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध (sexual relations) प्रस्थापित करु नका.
- तुमच्या गुप्तांगाची स्वच्छता राखा.
२०३० पर्यंत एड्सचा (AIDS) धोका सार्वजनिक जीवनातून संपुष्टात आणणे असे जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) ध्येय आहे. यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची नितांत गरज आहे. (World AIDS Day 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community