US Strike Afghanistan: अल- कायदा प्रमुख अल- जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार

अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसून सर्वात मोठी कारवाई केली आहे. सीआयएच्या (CIA) ड्रोन हल्ल्यात अल कायदा दहशतवादी अल जवाहिरीला ठार मारण्यात आले आहे. अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सने ही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेने ड्रोन स्ट्राईक करुन मोठी कारवाई केल्याची, घोषणा व्हाईट्स हाऊसने केल्याचे अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सने म्हटले आहे. ओसामा बिन लादेन याला मारल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा अमेरिकेच्या अधिका-यांनी केला आहे.

आता खरा न्याय मिळाला- बायडेन

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. बीबीसीच्या वृत्तानुसार, बायडेन म्हणाले की, आता खरा न्याय मिळाला.

( हेही वाचा: पक्ष फुटल्यानंतर उपनेतेपदासाठी ठाण्यातील महिलेची शिवसेनेला झाली आठवण )

जवाहिरी आणि लादेन अमेरिकेवरील 9/11 हल्ल्याचे सूत्रधार

अमेरिकेच्या अधिका-यांनी सांगितले की, ड्रोनने दोन क्षेपणास्त्रे डागली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. ते म्हणाले की, कुटुंबातील इतर सदस्य घटनास्ठळी उपस्थित होते, परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही आणि फक्त जवाहिरी मारला गेला. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने अल- कायदाला आपल्या ताब्यात घेतले. तो आणि लादेन हे अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याचे सूत्रधार होते. जवाहिरी हा अमेरिकेच्या मोस्ट वाॅन्टेड टेररिस्ट पैकी एक होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here