दरवर्षी ७ मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन (World Athletics Day) साजरा केला जातो. इंटरनॅशनल अम्युअर ऍथलेटिक फेडरेशन IAAF द्वारे ‘Athletics for a Better World’ हा सामाजिक दायित्व प्रकल्प म्हणून स्थापित केला गेला. ॲथलेटिक्समधील युवकांचा सहभाग वाढवणे आणि आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. (World Athletics Day)
जागतिक ॲथलेटिक्स दिनाचे (World Athletics Day) महत्त्व ॲथलेटिक्सच्या माध्यमातून लोकांमध्ये खेळाविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यांना निरोगी राहण्यासाठी प्रेरित करणे हे आहे. जागतिक ॲथलेटिक्स दिनाच्या माध्यमातून, विविध ॲथलेटिक संघ आणि संस्थांना त्यांच्या खेळांची जाणीव करून देण्याची आणि त्यांच्या खेळासाठी प्रोत्साहित केले जाते. (World Athletics Day)
(हेही वाचा – North East Mumbai Lok Sabha Election 2024 : संजय पाटील यांना उबाठा शिवसैनिकच आपले मानतात?)
‘या’ उद्देशाने साजरा केला जातो जागतिक ॲथलेटिक्स दिन
१९९६ मध्ये, इंटरनॅशनल अम्युअर ऍथलेटिक फेडरेशनने जागतिक ॲथलेटिक्स दिन (World Athletics Day) सुरू केला. त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघाची स्थापनाही झाली. जागतिक ॲथलेटिक्स दिन साजरा करण्यामागचा उद्देश लोकांमध्ये ॲथलेटिक्स खेळाविषयी जागरुकता वाढवणे हा आहे. तरुणांना खेळाचे महत्त्व समजावे आणि ॲथलेटिक्सला शाळा आणि संस्थांमध्ये प्राथमिक खेळ म्हणून प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. (World Athletics Day)
जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या धावणे, शॉट थ्रोविंग आणि इतर ॲथलेटिक्स गेम्स खेळण्यासाठी प्रोत्साहित करतात. चला तर या ॲथलेटिक्स दिनानिमित्त आपणही तरुणांमध्ये ॲथलेटिक्स गेम्सविषयी जागरुकता निर्माण करुया आणि देशाचा विकास करुया. (World Athletics Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community