World Braille Day : भेटा ब्रेल लिपी तयार करणार्‍या अद्भुत शिक्षणतज्ञाला…

228
World Braille Day : भेटा ब्रेल लिपी तयार करणार्‍या अद्भुत शिक्षणतज्ञाला...
World Braille Day : भेटा ब्रेल लिपी तयार करणार्‍या अद्भुत शिक्षणतज्ञाला...

आज World Braille Day आहे. ज्या महापुरुषाने ब्रेल लिपी निर्माण केली त्यांचा जन्मदिवस. आज ब्रेल लिपी खूपच प्रचलित झाली आहे. अंधांना या लिपीद्वारे जणू नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. आता तर यामध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का की ही लिपी कोणी विकसित केली होती ? चला तर आज आम्ही तुम्हाला त्या अवलियाची भेट घडवून देणार आहोत.

(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी)

अंधांसाठी लेखन आणि वाचनप्रणालीची निर्मिती

त्यांचं नाव आहे लुई ब्रेल (Louis Braille)… ते फ्रेंच शिक्षणतज्ञ आणि संशोधक होते. त्यांनी अंधांसाठी लेखन आणि वाचनप्रणाली (Writing and Reading System for Blind) विकसित केली. ही पद्धत ‘ब्रेल’ नावाने जगप्रसिद्ध आहे. फ्रान्समध्ये जन्मलेले लुई ब्रेल (Louis Braille) अंधांना दृष्टी प्रदान करणारे देवता ठरले. पण तुम्हाला माहिती आहे का ? ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी वाचनाची अडचण दूर करणारे लुई स्वतःही अंध होते.

खेळत असताना चाकू डोळ्यात गेल्याने अंधत्व

लुई ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी फ्रान्समधील कुप्रे या छोट्या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वडिलांना खूप कष्ट करावे लागले. लुई ३ वर्षांचे असतांना ते लुईला देखील कामासाठी सोबत घेऊन जायचे. वडील घोड्यांसाठी वस्तू बनवायचे; म्हणून लुई (Louis Braille) लहानपणापासूनच घोड्याची नाळ, लोखंड, चाकू इत्यादींसोबत खेळू लागला. त्यामुळे एकदा तो खेळत असताना चाकू त्याच्या डोळ्यात गेला आणि डोळे रक्तबंबाळ झाले. अशा प्रकारे लुई अंध झाला. काही दिवसांनी त्याचा दुसरा डोळादेखील काम करेनासा झाला.

(हेही वाचा – Veer Savarkar : पुण्यात ६ जानेवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा)

‘रॉयल इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड’मध्ये प्रवेश

लुई (Louis Braille) यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण केलं. १८१९ रोजी वयाच्या १० व्या वर्षी त्यांना ‘रॉयल इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड’मध्ये (Royal Institute for the Blind) प्रवेश मिळाला. जेव्हा ते १२ वर्षांचे झाले, तेव्हा त्यांना कळलं की, रॉयल आर्मीचा निवृत्त कॅप्टन चार्ल्स बार्बर याने सैन्यासाठी अशी एक गोष्ट विकसित केली आहे, जिच्या मदतीने ते अंधारातही संदेश वाचू शकतील. कॅप्टन चार्ल्स बार्बरचा (Captain Charles Barber) उद्देश युद्धादरम्यान सैनिकांना येणाऱ्या अडचणी कमी करणे हा होता.

अथक प्रयत्नांनी बनवली ब्रेल लिपी 

मग लुईने विचार केला की, जर सैनिक अंधारात वाचू शकतात, तर अंध का नाही वाचू शकणार? अथक प्रयत्नांनी त्याने कॅप्टनची भेट घेतली. तेव्हा लुईने कॅप्टनला काही सुधारणा सुचवल्या. कॅप्टन लहान मुलाची हुशारी पाहून धक्क झाले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे सुधारणा केल्या. पुढे लुईने खूप कष्ट करून स्वतःची ब्रेल लिपी १८२९ मध्ये तयार केली. मात्र दुर्दैव असे की, ब्रेल लिपीला (Braille script) अधिकृत मान्यता मिळाली नाही. ती भाषा नाही, असे शिक्षणतज्ञांचे मत होते. हा संघर्ष त्यांच्या मृत्यूपर्यंत चालला.

मृत्यूनंतर १०० वर्षांनी मिळाला सन्मान

अनेक वर्षे प्रयत्न करूनही या भाषेला मान्यता देण्यात ब्रेल यांना यश मिळाले नाही. ६ जानेवारी १८५२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर १०० वर्षांनी लोकांना जाग आली आणि २० जून १९५२ दिवशी त्यांचा गौरव करण्यात आला. या दिवशी शंभर वर्षांपूर्वी दफन केलेले त्यांच्या पार्थिवाचे अवशेष शासकीय सन्मानाने बाहेर काढण्यात आले. मग त्यांच्या शरीराच्या अवशेषासमोर राष्ट्राने त्यांची माफी मागितली आणि तिथपासून ब्रेल लिपीला (Braille script)
स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता मिळाली. आज ही लिपी अंधांसाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ आणि ब्रेल लिपीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच अंध व्यक्तींच्या मानवाधिकाराला प्रोत्साहन देण्यासाठी दर वर्षी ४ जानेवारीला World Braille Day साजरा केला जातो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.