युनिसेफने २०२०पर्यंतचा जागतिक पातळीवरील बालकामगारांचा सांख्यिकी अहवाल प्रसिद्ध केला आहे. ‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’ (International Labor Organization) आणि ‘युनायटेड नेशन्स चाइल्ड फंड’ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये जगभरात १६० दशलक्ष बालकामगार आहेत आणि कोरोना या जागतिक महामारीमुळे २०२२पर्यंत यात ९० लाख बालकामगारांची भर पडणार आहे, अशी धक्कादायक माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. १२ जून या जागतिक बालकामगार दिनाआधीच हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
160M children worldwide are in child labour. This is a disgrace.
A new report by @unicef & @ilo says 9M more are at risk of being pushed into child labour by the end of 2022 as a result of the pandemic.
We must redouble efforts to #EndChildLabour https://t.co/5fMYK22RXJ
— António Guterres (@antonioguterres) June 10, 2021
मागील ४ वर्षांत ४० लाख नवे बालकामगार!
या अहवालात मागील दोन दशकांत पहिल्यांदाच बालकामगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे, असे म्हटले आहे. या अहवालानुसार जगभरात बालकामगारांची संख्या तब्बल १६० दशलक्षपर्यंत पोहोचली आहे. मागील चार वर्षामध्ये सुमारे ४० लाख नवे बालमजूर जोडले गेले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. युनिसेफ (UNICEF) आणि आयएलओ (ILO) ने हा अहवाल ”Child Labour: Global estimates 2020, trends and the road forward’ या नावाने प्रसिध्द केला आहे. या अहवालामधून जागतिक बँकेला आवाहन करण्यात आले आहे. जी लहान मुले सध्या बालकामगार म्हणून काम करत आहेत त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावेत, असे युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोर यांनी म्हटले आहे. तसेच या अहवालामध्ये जगभरातील देशांच्या सरकारांनाही त्यांच्या त्यांच्या देशामध्ये बालकांसाठी सामाजिक सुरक्षा कार्यक्रम चालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरुन आपल्या कुटुंबातील लहान मुलांना बालमजुरी करण्यासाठी पाठविण्याची गरज भासू नये, असे म्हटले आहे .
(हेही वाचा : शिखांना भडकवण्याचं ‘इस्लामी’ कारस्थान… कोण आहे यामागचं पाकिस्तानी ‘प्यादं’?)
कोरोनामुळे ९० लाख बाल कामगारांची भर पडणार!
जागतिक पातळीवर १६० दशलक्ष बालकामगार आहेत. त्यात ६३ दशलक्ष मुली आणि ९७ दशलक्ष मुले आहेत. यात ५ ते १७ वयोगटातील बालकामगारांत ११.२ टक्के मुले आणि ७.८ टक्के मुली आहेत. या अहवालात कोरोना या जागतिक महामारीमुळे २०२२पर्यंत ९ लाख बालकामगारांची भर पडेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. ५ ते १७ वयोगटातील बालमजुरी करणाऱ्यांची संख्य़ा २०१६ पासून आतापर्यंत वाढतच चालली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये आफ्रिकेतील सब-सहारामध्ये १.५ कोटीहून अधिक मुले बालमजुरीचे बळी ठरली आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे लॅटिन अमेरिका, आशिया पॅसिफिक आणि कॅरिबियन देशांमध्येही होणारी प्रगती खुंटत चालली आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे २०२२ च्या अखेरीस अतिरिक्त ९० लाख बालकांना बालकामगारांची यात भर पडणार आहे, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.
भारतात ३३ लाख बालकामगार!
भारतात एकूण ३३ लाख बालकामगार आहेत. यात ग्रामीण भागात बालकामगारांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण बालकामगारांपैकी ८० टक्के बालकामगार हे ग्रामीण भागात आहेत. औद्योगिक, कृषीसह घरातील नोकर आणि पाळणाघरात कामगार म्हणून भारतात बालकामगारांच्या वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीमुळे देशभरात मोठ्या संख्येने मुले हे शाळेपासून दूर गेली असून त्यातील बरेच जण बालकामगार होणार आहेत.
(हेही वाचा : पवार-किशोर यांच्या भेटीत नेमकं काय शिजलं? वाचा…)
Join Our WhatsApp Community