World Climate Day : पर्यावरणाविषयी जागृती नसणे हेच आश्चर्यकारक !

आज युरोप, अमेरिका आणि मध्य आशिया हे हवामान पालटामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना मोठ्या प्रमाणात सामोरे जात आहेत.

44
World Climate Day : पर्यावरणाविषयी जागृती नसणे हेच आश्चर्यकारक !
  • अनिल साखरे

खरेतर ‘पृथ्वीचे तापमानवाढ’ हा विषय जगभरातील सर्व राष्ट्रांच्या प्राधान्य क्रमावर आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असायला हवा; परंतु या संदर्भातही जगाची वाटणी श्रीमंत जग विरुद्ध गरीब जग, अशी झालेली मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. उद्या पृथ्वीच्या तापमान वाढीमुळे वा हवामान पालटामुळे संपूर्ण जगात ज्या काही नैसर्गिक आपत्ती ओढवतील, त्यामध्ये निसर्ग हा उत्तर वा दक्षिण जग अशी विभागणी करणार नाही किंवा त्याची किंमत केवळ अविकसित आणि अर्धविकसित देशांनाच मोजावी लागणार, असे नाही. आज युरोप, अमेरिका आणि मध्य आशिया हे हवामान पालटामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना मोठ्या प्रमाणात सामोरे जात आहेत. (World Climate Day)

(हेही वाचा – Hawkers : दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात अपयश; आता मोठी कारवाई करण्याचा विचार?)

युरोपमधील काही देश सोडले, तर सर्व राष्ट्रांमध्ये आनंदी आनंदच आहे. भारतामध्ये बघितले, तर मुंबईसारखे जागतिक शहर असलेल्या महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यामध्ये पर्यावरण हा मुद्दाच नाही. पर्यावरण रक्षण आणि हवामान पालट यांविषयी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. जागतिक हवामान परिषदेमध्ये पर्यावरणवादी संस्था आणि कार्यकर्ते यांना किती प्रमाणात सामील करून घेतले जाते अन् त्यांचा आवाज किती ऐकला जातो, याविषयीही मोठा प्रश्नच आहे. या परिषदेमध्ये पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी जे काही निर्णय घेतले जातात, याविषयी जगाला प्रदूषित करणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणावर कार्ब उत्सर्जन करणाऱ्या मोठ्या देशांना अन् आस्थापनांना कायद्याने बांधिलकी आणण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण रक्षण आणि हवामान पालट हा जगभरातील नागरिकांनी आपल्या जिव्हाळ्याचा अन् जीवनशैलीचा विषय केला, तरच पुढे सृष्टीचा टिकाव लागेल. (World Climate Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.