World Computer Literacy Day : जागतिक संगणक साक्षरता दिन का साजरा केला जातो?

53
World Computer Literacy Day : जागतिक संगणक साक्षरता दिन का साजरा केला जातो?
World Computer Literacy Day : जागतिक संगणक साक्षरता दिन का साजरा केला जातो?

जागतिक संगणक साक्षरता दिन २ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून जगभरातील लोकांना संगणकाचे महत्त्व पटवून दिले जाते. लोकांना संगणक शिकण्यासाठी देखील प्रोत्साहन दिले जाते. संगणक साक्षरता म्हणजे संगणक कसे कार्य करतात, ते कसे प्रोग्राम करायचे आणि जगामध्ये चांगुलपणा रुजवण्यासाठी त्यांचा वापर कसा करायचा हे जाणून घेणे. (World Computer Literacy Day)

(हेही वाचा- Mahakal Temple: महाकाल मंदिरात आता ATM सारख्या मशीनमधून लाडू प्रसाद मिळणार; पेमेंट कसे होणार?)

आजच्या युगात संगणकाशिवाय कोणतेही काम करणे शक्य नाही. आज संपूर्ण जग डिजिटल पद्धतीने एकमेकांशी जोडले गेले आहे. पण त्यामागे संगणकाची मोठी भूमिका आहे. संगणकाशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. आजच्या काळात संगणकाद्वारे कोणतेही काम फार कमी वेळात करता येते. कोरोना महामारीच्या काळात संगणकाचे महत्त्व खूप वाढले होते. कारण त्यावेळी सर्व प्रकारची कामे केवळ ऑनलाइनच होत होती. (World Computer Literacy Day)

२० व्या वर्धापनदिनानिमित्त, भारतीय संगणक कंपनी NIIT ने २००१ मध्ये जागतिक संगणक साक्षरता दिनाची सुरुवात केला. NIIT ने भारतभर IT ज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला. कोरोनामुळे ही तफावत आणखी वाढली होती. ऑनलाइन शिक्षण हा एकमेव पर्याय असल्याने बर्‍याच लोकांना अडचण झाली आणि डिजिटल कौशल्य नसलेल्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. हा उपक्रम या डिजिटल डिव्हाइडमुळे निर्माण झालेली दरी भरून काढण्याचा प्रयत्न करतो. (World Computer Literacy Day)

(हेही वाचा- Rohit Sharma : रोहित शर्मा ॲडलेडमध्ये मधल्या फळीतच खेळणार का?)

मात्र संगणकाचे ज्ञान असणे पुरेसे नाही तर त्याचा वापर कसा करावा याचे भान असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज संगणकाच्या युगात अनेकदा फसवाफसवी होते, त्यापासून सावध असणे देखील गरजेचे आहे आणि तुम्ही स्वतःचे संरक्षणही केले पाहिजे. म्हणूनच जागतिक संगणक साक्षरता दिन अशा विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकतो. (World Computer Literacy Day)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.