जागतिक ग्राहक अधिकार दिन दरवर्षी १५ मार्च रोजी साजरा केला जातो. जगभरातील ग्राहकांसाठी हा एक जागतिक उत्सव असतो. कारण या दिनाद्वारे ग्राहकांच्या अधिकारांवर प्रकाश टाकला जातो. ग्राहकांच्या अधिकारांबद्दल जागरुकता वाढवणे आणि व्यावसायिक क्षेत्रातील न्याय्य आणि नैतिक धोरणे आणि नियमांचे पालन करणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. (World Consumer Rights Day)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर म्हणाले…)
जागतिक ग्राहक अधिकार दिनाची सुरुवात कशी झाली ?
ग्राहकांचे शोषण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातात. १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकेच्या काँग्रेसला ग्राहकांच्या अधिकाराबाबत एक विशेष संदेश पाठवला होता. यातूनच जागतिक ग्राहक अधिकार दिनाची सुरुवात झाली. ग्राहक चळवळ प्रथम १९८३ मध्ये उदयास आली आणि त्यानंतर पुढे या चळवळीला गती मिळाली.
यंदा कोणती थीम आहे ?
जागतिक ग्राहक हक्क दिनाची थीम दरवर्षी बदलते. याद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण, शिक्षण आणि कायदेशीर लढाईला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. शाश्वत उपभोगाचा प्रचार करण्यापासून ते डिजिटल अधिकार आणि गोपनीयतेच्या समस्यांचे निराकरण करण्यापर्यंत बाजारपेठेत ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढला जातो. ““Fair and responsible AI for consumers”” ही या वर्षीची (२०२४) थीम आहे.
ग्राहकांचे मुख्य ६ अधिकार आहेत. सुरक्षिततेचा अधिकार, माहिती मिळण्याचा अधिकार, निवडण्याचा अधिकार, ऐकून घेतले जाण्याचा अधिकार, समस्या सोडवण्याचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार. हे अधिकार ग्राहकांना मिळायलाच हवेत. आपण सगळेच ग्राहक आहोत, आपण जागरुक राहिलं पाहिजे आणि कोणतीही फसवणूक व अन्याय सहन करता कामा नये. (World Consumer Rights Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community