World Health Day : निरोगी जीवनशैलीसाठी आहार आणि झोप यांचा समतोल साधा !

218
Healthy Lifestyle : निरोगी जीवनशैलीसाठी आहार आणि झोप यांचा समतोल साधा !
Healthy Lifestyle : निरोगी जीवनशैलीसाठी आहार आणि झोप यांचा समतोल साधा !
  • डॉ. दीपक जोशी

काय खावे आणि काय खाऊ नये, दिनचर्या कशी असावी, किती वाजता आणि किती वेळा जेवावे, याविषयी सतत वेगवेगळ्या चर्चा घडत असतात. कोणी विषय काढायचीच कमी की, सगळे जण आपण कुठे तरी वाचलेले, कानावर पडलेले, स्वतःला एखाद्या प्रसंगात डॉक्टरांनी सांगितलेले आग्रहाने सांगत राहतात. आधीच व्हॉट्सअप (WhatsApp) विद्यापिठाची काय कमी होती, त्यात आता आणखी सोशल मिडियाची भर पडली आहे. त्यामुळे कोणी काय खावे आणि काय खाऊ नये, याविषयी सल्ल्यांचा अक्षरशः भडिमार होत असतो. अशा या सगळ्या कोलाहलात नेमके कोणाचे खरे, तेच कळत नाही. त्यामुळेच निरोगी जीवनशैली (Healthy Lifestyle) अनुसरण्यासाठी नेमके काय करावे, हे या लेखातून जाणून घेऊया ! (World Health Day)

सध्याचे गतीमान आयुष्य, नोकरी-व्यवसायाच्या (Job/Business) वेळा आणि आपली प्रकृती यांनुसार आपण किती वेळा जेवावे, हे ज्याने, त्याने ठरवायचे असते. असे असले, तरी आपल्याकडे एक म्हण आहे. ती म्हणजे, एक वेळ खातो तो योगी, २ वेळा जेवतो तो भोगी आणि ३ वेळा जेवतो, तो रोगी ! त्यामुळे येथे बाकी परिस्थिती आणि गतीमान जीवनशैलीला (Healthy Lifestyle) धरून किमान २ वेळा जेवण्याचा सल्ला दिला आहे. (World Health Day)

(हेही वाचा – ‘श्रीलंकेची भूमी भारताविरुद्ध वापरली जाणार नाही’; पंतप्रधान Narendra Modi यांच्या सोबतच्या बैठकीत राष्ट्रपती दिसानायके यांचे आश्वासन)

आहार कधी आणि किती घ्यावा ?

आरोग्य चांगले राहण्यासाठी सकाळी लवकर उठून थोडे पाणी (Water) प्या. ते साधे किंवा कोमट कसेही असले, तरी चालेल. सकाळी पोट साफ होणे आवश्यक आहे. ज्यांचे सकाळी उठल्या उठल्या पोट चांगले साफ होते, ती व्यक्ती पोटाच्या बाबतीत निरोगी असते. (World Health Day)

  • सकाळच्या वेळेत भिजवलेले दोन-दोन ड्राय फ्रुट्स खाऊ शकता.
  • साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान पोटभर जेवण करावे.
  • दुपारी दीड-दोन वाजता एखादे फळ (Fruit) खाऊ शकता.
  • संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान आपल्याला सोयीची असलेली एक वेळ ठरवून त्या वेळी एक भाकरी-भाजी खावी. सध्या अनेक कुटुंबात दुपारी पोळी-भाजी आणि रात्री आमटी-भात, वरण-भात असे जेवण असते. रात्री भात करणे सोयीचे असले, तरी भात पचायला जड असतो. त्यामुळे येथे भाकरी सुचवली आहे. तरीही स्वयंपाक करण्याच्या सोयीसाठी भात खायचाच असेल, तर दक्षिण भारतात ज्या पद्धतीने बनवला जातो, तसा वरचे पाणी काढून बनवलेला भात तुलनेने पचायला हलका होतो. तो तूप-भात, दही-भात, मूगाचे वरण-भात असा खाता येतो. रात्रीच्या वेळी मसालेदार आमट्या शक्यतो टाळाव्यात.

(हेही वाचा – Cheetahs Viral Video : चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं ! वन विभागाची धडक कारवाई)

लवकर बाहेर पडावे लागते, त्यांनी काय करावे ?

सकाळी लवकर उठून प्रथम पोट साफ कसे होईल, हे बघावे. त्यानंतर त्यांनी जेवण करून किंवा ते शक्य नसल्यास थोडीशी न्याहारी करून बाहेर पडावे. साधारणतः सकाळी १०.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान ऑफिसमधून वेळ घेऊन किंवा परवानगी घेऊन जेवण करावे. त्यानंतर ३-४ वाजता एखादे फळ खावे. संध्याकाळी शक्यतो जितक्या लवकर होईल, तितके लवकर म्हणजे साधारण ७ च्या आत जेवण करावे. (World Health Day)

जागरण करावे लागते, त्यांनी काय करावे?

ज्यांना रात्रीचे जागरण करावे लागते, त्यांनी दुसऱ्या दिवशी आवश्यक तितकी झोप घेणे गरजेचे आहे. अशा वेळी मसालेदार पदार्थ, तुरीची डाळ, खूप तिखट खाणे टाळावे. जागरणामुळे आधीच शरीरातले पित्त वाढलेले असते. पित्त वाढून शरीर गरम होते. शरिरातली उष्णता वाढते. त्यामुळे केस गळणे, केस पांढरे होणे, अॅसिडिटी, गॅसेस, पोट साफ न होणे अशा तक्रारी सुरू होतात. शक्यतो जागरण टाळावेच; अपरिहार्य कारणाने नियमित जागरण होत असल्यास आहारात आवळ्याचा समावेश भरपूर प्रमाणात करावा. आवळा कँडी, आवळा सिरप, आवळा सुपारी, असे कोणत्याही स्वरूपात आवळा खाल्ला तरी चालेल. समजा आवळा कँडी खायची असेल, तर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ३-४ फोडी, दुपारी जेवणानंतर ३-४ फोडी, त्यानंतर ४ वाजता ३-४ फोडी आणि रात्रीच्या जेवणानंतर ३-४ फोडी असे नियमित खाऊ शकता. त्याने जागरणामुळे शरीरात निर्माण होणारी उष्णता कमी होण्यास सहाय्य होते. (World Health Day)

(हेही वाचा – LIC Jeevan Utsav : एलआयसीच्या जीवन उत्सव योजनेतून निवृत्तीनंतर मिळवा दरमहा १५,००० रु)

झोपेचे नियोजन कसे करावे ?
  • सर्वसामान्यपणे रात्री शक्यतो अकराच्या आत झोपावे.
  • नियमित पहाटे उठावे लागते, त्यांनी किमान झोप पूर्ण होण्यासाठी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झोपलेच पाहिजे.

माझ्याकडे बीपीचे बरेच पेशंट आहेत. त्यांची हिस्ट्री घेतल्यावर लक्षात येते की, त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्यांची बराच कालावधीपर्यंत झोप पूर्ण होत नाही, त्यांना काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी बीपीचा त्रास १०० टक्के होतो. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी झोप पूर्ण होणे आवश्यक आहे. (World Health Day)

मिलेट्स, ओट्स नियमित आहारात हवे का ?

हल्ली हेल्दी फूड म्हणून पनीर, कडधान्ये, मिश्रधान्ये, ओट्स यांचा नियमित आहारात समावेश केला जातो. भारत सोडून कोणत्याही देशात गेल्यास आपल्यासारखे वरण, भात, भाजी, पोळी, पापड, लोणचं, चटणी, कोशिंबीर असे कधी बघतो का? भारतीय अन्नातून सर्व समावेशक विटामिन्स, प्रथिने मिळतातच. त्यामुळे आपल्या अन्नातून आपल्याला प्रोटीन मिळत असतील, तर वरून इतर आहारातून अनावश्यक प्रोटीन घेणे, पनीर खाणे टाळावे. (World Health Day)

किमान व्यायाम कोणते करावेत ?

योगासने, व्यायाम यांचे फायदे अनेक असतात. आपल्याला ते माहितीही असतात. असे असले, तरी वेळ नाही, या कारणाने व्यायाम हा विषय यु ट्यूब किंवा इन्स्टाग्रामवर रिल्स पाहण्यापुरताच मर्यादित राहतो. असे न करता कितीही व्यस्त असलो, तरी निरोगी जीवनासाठी (Healthy Lifestyle) नियमित किमान २० ते ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम प्रत्येकाने करायला हवा. ज्यांचे काम बैठ्या स्वरूपाचे आहे, त्यांनी दर २-३ तासांनी मानेचे, खांद्याचे आणि कमरेचे व्यायाम करणे आवश्यक आहे. (World Health Day)

(लेखक निसर्गोपचार तज्ञ असून नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सचे पदवीधर आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.