World Kidney Day : का साजरा केला जातो जागतिक मूत्रपिंड दिन?

२००६ मध्ये किडनीच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक किडनी दिनाची घोषणा करण्यात आली.

254
World Kidney Day : का साजरा केला जातो जागतिक मूत्रपिंड दिन?

यंदा १४ मार्चला जागतिक किडनी दिन (World Kidney Day) साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे हा दिवस प्रत्येक मार्चमध्ये दुसर्‍या गुरुवारी साजरा केला जातो. मानवी शरीराला योग्यरितीने काम करण्यासाठी किडनीची म्हणजेच मूत्रपिंडाची आवश्यकता असते. आरोग्यदायी किडनी म्हणजे निरोगी शरीर, असं हे समीकरण आहे. म्हणूनच किडनी (मूत्रपिंड) विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक किडनी दिन म्हणजे मूत्रपिंड दिन साजरा केला जातो. (World Kidney Day)

सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे जगभरातील कोट्यवधी लोक किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. गंभीर बाब म्हणजे जगभरात ८० कोटी लोकांना किडनीच्या तीव्र आजाराने ग्रासले आहे. साधारणपणे वृद्ध व्यक्ती आणि मधुमेहाने त्रस्त लोकांच्या मूत्रपिंडावर जास्त परिणाम होतो. (World Kidney Day)

मूत्रपिंडाचा कोणताही आजार झाला की त्याचा परिणाम एकूण आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवाबद्दल लोकांना जागरुक करणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांना किडनीचे महत्त्व समजावे आणि किडनीच्या आरोग्याबाबत काळजी घेतली जावी, यासाठी जागतिक किडनी दिन (World Kidney Day) सुरू करण्यात आला. (World Kidney Day)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : कोटक यांचा पत्ता कापला, चर्चेत नसलेल्या मिहिर कोटेचा यांना भाजपाकडून उमेदवारी)

ही आहे यावर्षीची थीम

वाचकहो, २००६ मध्ये किडनीच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक किडनी दिनाची घोषणा करण्यात आली. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी (आयएसएन) आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन (आयएफकेएफ) यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. (World Kidney Day)

यावर्षी १४ मार्च २०२४ रोजी जागतिक किडनी दिन साजरा केला जात आहे. जागतिक किडनी दिन २०२४ ची थीम ‘Kidney Health for All’ आहे. किडनीच्या आरोग्याबाबत लोकांना जागरुक करणे हा या थीमचा उद्देश आहे. तसेच किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना योग्य उपचार मिळावेत, यावरही या थीमद्वारे भर देण्यात आली आहे. (World Kidney Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.