देशात आजही तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. दर दिवसाला साडेतीन हजार माणसे तंबाखूजन्य पदार्थ्याच्या सेवनाने मृत्यू पावत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या तंबाखू नियंत्रण योजना अहवालातून देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत वाढत्या महागाईत सिगारेट आणि बिडीच्या किंमती वाढत असल्या तरीही ९० टक्के व्यसनाधीन माणसे अद्याप धूम्रपान सोडण्यास तयार नसल्याचे हिलीस सेखरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ या आरोग्यसेवी सामाजिक संस्थेच्या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.
( हेही वाचा : पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतरही रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांचा विळखा आवळलेलाच)
सिगारेट आणि बिडीमुळे ९ लाख व्यसनाधीन माणसे दर वर्षाला भारतात मृत्यू पावतात. तरीही धूम्रपानापासून व्यसनाधीन माणसांना व्यसानापासून अलिप्त राहता येत नाही. कारण किंमती फार वाढलेल्याच नाहीत. पाच रुपयांची सिगारेट आता ११ रुपयांना मिळते. ही किंमत मध्यमवर्गीसांठी फार मोठी नाही. बिडी आता पाच रुपयांत उपलब्ध आहे. ही किंमत निश्चितच महागाईची झळ दाखवणारी नाही, अशी माहिती हिलीस रोखरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. पेडणेकर यांनी दिली. यासाठी सरकराने धूम्रपान नियंत्रणात आणण्यासाठी सिगारेट आणि बिडीच्या किंमती वाढवणे गरजेचे असल्यची मागणी डॉ. पेडणेकर यांनी दिली.
बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हे सर्व्हेक्षण केले गेले. बिहारमध्ये २ हजार ५९८, पश्चिम बंगालात २ हजार ६३७, मध्य प्रदेशात २ हजार ६२० तर महाराष्ट्रातील २ हजार ६१९ व्यसनाधीन व्यक्तींची संस्थेने मुलाखत घेतली. कित्येकांनी धूम्रपान सोडण्यास प्रबळ इच्छा नसल्याचेही कबूल केले.
व्यसनाधीनता सोडवण्यासाठी मोठ्या स्तरावर उपाययोजना हव्यात
व्यसनाधीन माणसांना व्यसनमुक्त करण्यासाठी देशात केवळ चार ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून समुपदेशन देणारी केंद्रे आहेत. प्रत्येक राज्यात ही केंद्रे उभारली जावीत, त्यासाठी सरकारने मोठ्या स्तरावर बजेटची तरतूद करावी, असे संस्थेच्यावतीने सूचवण्यात आले.
Join Our WhatsApp Community