दरवर्षी २१ मार्च रोजी जगभरात “जागतिक कविता दिन” (World Poetry Day) साजरा केला जातो. युनेस्कोने कवी आणि कवितेच्या सर्जनशीलतेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (युनेस्को) च्या ३० व्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. कवितेतील एकात्मता शक्ती ओळखून, युनेस्कोने या कलात्मक अभिव्यक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित दिवसाची कल्पना मांडली. कविता लोकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते, इतरांना प्रेरणा देऊ शकते आणि सुसंवाद निर्माण करू शकते, हा यामागचा दृष्टिकोन होता.
१९९९ मध्ये युनेस्कोने जागतिक कविता दिनाची (World Poetry Day) घोषणा केली आणि त्यांनी सांगितले की, हा दिवस साजरा करण्यामागील त्यांचे उद्दिष्ट “काव्यात्मक अभिव्यक्तीद्वारे भाषिक विविधतेला पाठिंबा देणे आणि धोक्यात असलेल्या भाषा शिकण्याची संधी वाढवणे” असा आहे. वाचकहो, जागतिक कविता दिनानिमित्त, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय आणि साहित्य अकादमीद्वारे सबद-जागतिक कविता महोत्सवाचे आयोजन केले जाते.
(हेही वाचा – मुंबई-महाराष्ट्रातील रुग्णालयांत जनेरिक औषधे उपलब्ध करणार का? Pravin Darekar यांचा सवाल)
कविता लोकांना जोडण्याचे आणि सांस्कृतिक समावेशनाला प्रोत्साहन देण्याचे काम करते. कविता हे विचार आणि भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याचे, शब्दांद्वारे सखोल अर्थ व्यक्त करण्याचे माध्यम आहे. कविता विविध भाषा आणि साहित्यिक परंपरा जिवंत ठेवण्यास मदत करते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आणि लोकांना प्रेरणा देण्यात कविता महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच हा दिवस (World Poetry Day) अत्यंत खास आहे.
दरवर्षी २१ मार्च रोजी आयोजित केला जाणारा जागतिक कविता दिन (World Poetry Day) विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी लोक आपली आवडती कविता सोशल मीडियावर पोस्ट करतात. आणि कवितेद्वारे लोक व्यक्त होतात. आपल्या राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक भावनांना वाट मोकळी करुन देतात. तर वाचकहो, तुमची आवडती कविता कोणती आहे?
हेही पहा –
Join Our WhatsApp Community