World Radio Day : दरवर्षी १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा करण्यात येतो

312
World Radio Day : दरवर्षी १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा करण्यात येतो
World Radio Day : दरवर्षी १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा करण्यात येतो

आताच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक युगामध्ये तुम्हाला असे वाटेल की, रेडिओ (World Radio Day) ऐकायला वेळ कोणाकडे आहे? पण जसं आजच्या काळात टिव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि अशी कितीतरी आधुनिक उपकरणं आपल्या आयुष्याचा एक भाग बनून राहिली आहेत, तसंच जेव्हा ही उपकरणं फार कमी लोकांकडे असायची किंवा इन्व्हेन्ट झालेलीच नव्हती त्यावेळेस रेडिओ (World Radio Day) हे एकच जनसामान्यांच्या मनोरंजनाचं साधन होतं. फक्त मनोरंजनाचं नाही तर माहिती मिळवण्याचंही एकमेव साधन होतं. थोडक्यात काय तर त्याकाळी रेडिओ हा माणसाच्या आयुष्याचाच एक भाग बनला होता.

(हेही वाचा – Prashant Sapkale, Ajitkumar Aambi : प्रशांत सपकाळे यांच्यावर उपायुक्तपदाचा भार, जी -उत्तरच्या सहायक आयुक्त अजितकुमार आंबी)

हल्ली इतर मनोरंजनाची साधने वाढली आहेत. त्यामुळे रेडिओचा (World Radio Day) वापर फार कमी होताना दिसतो. पण म्हणून त्याचं महत्व अजिबात कमी झालेलं नाहीय. याउलट बदलत्या काळानुसार रेडिओच्या स्वरूपातही बरेचसे बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतील. हल्ली रेडिओचं FM म्हणून नवं व्हर्जन आलं आहे. तसंच पूर्वी रेडिओवर बोलणारे निवेदक असायचे, आता ते RJ म्हणजेच रेडिओ (World Radio Day) जॉकी झाले आहेत. रेडिओ प्रोग्राम प्रेझेंटेशनच्या स्टाईलमध्येही आता आपल्याला पुष्कळ फरक जाणवतो. तरीसुद्धा रेडिओ हे सहजपणे आणि स्वस्तात उपलब्ध होणारे महत्त्वाचे साधन आहे.

त्याकाळी रेडिओ (World Radio Day) म्हणजे माहिती प्रसारित करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन होतं. आकाशवाणीवर वेगवेगळे गाण्यांचे कार्यक्रम प्रसारित व्हायचे, अनेक नाटके वाचिक अभिनय करून वाचली जायची. एवढेच नाही तर जगभरातल्या बातम्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांना रेडिओ हा एक उत्तम प्लॅटफॉर्म असायचा.

(हेही पहा – Ashok Chavan आज भाजपमध्ये प्रवेश करणार)

भारतात १९२७ साली पहिल्यांदाच रेडिओवरचा (World Radio Day) कार्यक्रम सादर करण्यात आला होता. टाईम्स ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसच्या संयुक्त विद्यमाने भारतात टाईम्स ऑफ इंडियाच्या मुंबई येथील इमारतीतून पहिल्यांदाच गाण्याचा एक कार्यक्रम प्रसारित केला गेला होता. युनेस्कोने २०११ साली १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन (World Radio Day) म्हणून साजरा करावा, अशी घोषणा केली होती. त्यानंतर २०१२ साली इटलीमध्ये झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच जागतिक रेडिओ दिन साजरा केला गेला होता. तेव्हापासून तो आजपर्यंत साजरा केला जातो.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.