रायगडमधील ‘हे’ शहर जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर

166

रायगड जिल्ह्यांतील भिरा येथील स्वयंचलित केंद्रातील कमाल तापमानाने पुन्हा जागतिक विक्रम मोडीत काढला. अप्रत्यक्षरित्या भिरा येथे नोंदवलेले कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने जागतिक क्रमवारीत उष्ण शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचले.

भिरा येथील स्वयंचलित केंद्र समुद्रसपाटीपासून बरेच अंतर लांब आहे. सध्या कोकणातील अंतर्गत भागांत गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा तापमानाच्या झळा दिसून आल्या आहेत. परिणामी, भिरा येथील स्वयंचलित केंद्रातही तापमान वाढ नोंदवली जात आहे. भिरा येथील वेधशाळेकडून अधिकृतरित्या घेतली जाणारी तापमान वाढीची नोंदणीही चार वर्षांपूर्वी बंद केली गेली. मात्र स्वयंचलित केंद्रातील कमाल तापमान वाढ गेल्या मार्च महिन्यापासून अधूनमधून जागतिक क्रमवारीत नोंदवले जात आहे. एप्रिल महिन्यातही ही रॅकोर्डब्रेक नोंद कायम आहे. मात्र भिरा येथील स्वयंचलित केंद्रातील तापमान नोंदीविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

(हेही वाचा – ‘या’ स्वयंचलित केंद्रातील तापमानाचा नवा रॅकोर्ड)

सोमवारी जागतिक क्रमवारीत विदर्भातील तीन शहरे उष्ण शहरांच्या यादीत झळकली
  • ४५ अंश सेल्सिअसच्या नोंदीसह वर्धा येथील कमाल तापमान पाचव्या स्थानावर पोहोचले.
  • ब्रह्मपुरीला नववे स्थान मिळाले. ब्रह्मपुरीतील कमाल तापमान ४४.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
  • चंद्रपूरातील कमाल तापमानाची नोंद ४४.६ अंश सेल्सिअश एवढी झाली. चंद्रपूराला अकरावे स्थान मिळाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.