सुधारक ओळवे (Sudhakar Olve) हे माहितीपट छायाचित्रकार (डॉक्युमेंटरी फोटोग्राफर) आहेत. त्यांचा जन्म १९ मार्च १९६६ रोजी अकोला येथे झाला. त्यांनी मुंबईतील सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून १९८६ मध्ये फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा केला. पुढे १९९२ साली मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज येथून फिल्म आणि व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये डिप्लोमा केला.
पण त्यांचे म्हणणे असे आहे की त्यांना (Sudhakar Olve) मिळालेले यश हे शैक्षणिक पात्रतेमुळे मिळाले नसून अनुभवामुळे मिळाले आहे. अनुभव हाच खरा शिक्षक आहे, असे त्यांचे मत आहे. कारण झालं असं की सुरुवातीच्या काळात ते मुंबईतील त्यांच्या घरातून हैदराबादला पळून गेले. तिथे त्यांना रस्त्यावर रहावं लागलं आणि हीच त्यांना मिळालेली खरी शिकवण होती. त्यांनी हे जीवन कॅमेरात कैद केलं.
सुधारक ओळवे (Sudhakar Olve) फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्टचे प्रमुख आहेत. ही संस्था केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही तरुणांना फोटोग्राफीचे ज्ञान प्रदान करते. सुधारक यांचे कार्य राष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रदर्शित झाले आहे. तसेच मुंबई, दिल्ली, माल्मो (स्वीडन), लिस्बन, ॲमस्टरडॅम, लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन आणि ढाका येथे त्यांची चित्रे प्रदर्शित झाली आहेत. २००५ मध्ये त्यांना नॅशनल जिओग्राफिकच्या “ऑल रोड्स फोटोग्राफी प्रोग्राम”साठी पुरस्कार देखील मिळाला आहे. २०१६ मध्ये त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community