World Television Day : तुमच्या घरात जो टिव्ही आहे, त्याचा इतिहास तरी काय आहे?

231
World Television Day : तुमच्या घरात जो टिव्ही आहे, त्याचा इतिहास तरी काय आहे?
World Television Day : तुमच्या घरात जो टिव्ही आहे, त्याचा इतिहास तरी काय आहे?

आज आहे जागतिक टेलिव्हिजन दिवस (World Television Day). २१ नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. आता टेलिव्हिजनने खूप प्रगती केली आहे. आता तर स्मार्ट टिव्ही देखील आलेला आहे. मात्र हा प्रवास इतका सोपा नव्हता. टिव्हीमध्ये खूप बदल होत गेले आहेत.

टेलिव्हिजनचा इतिहास

२१ नोव्हेंबर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली होती. १९२७ मध्ये फिलो टेलर फार्नस्वर्थ नावाच्या २१ वर्षांच्या मुलाने पहिला इलेक्ट्रॉनिक टिव्ही निर्माण केला असं म्हणायला हवं. यास ऑल-इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजन प्रणाली म्हटले जायचे. १४ वर्षांचा असेपर्यंत त्याच्या घरात लाईट नव्हती. हायस्कूलमध्ये गेल्यानंतर त्याच्या मनात टिव्ही निर्माण करण्याचा विचार आला.

त्याला हलणारे चित्र कॅप्चर करुन आणि कोडमध्ये रुपांतरित करायचे होते आणि रेडिओ किरणांचा वापर करुन दुसर्‍या डिव्हाइसमध्ये ट्रान्स्फर करायचे होते. पुढे जॉन लॉगी बेअर्ड यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले. १९३४ मध्ये टिव्ही पूर्णपणे बनवून तयार झाला. कारण यास इलेक्ट्रॉनिक स्वरुप द्यायला ७ वर्षे लागली. मात्र २ वर्षांतच टिव्ही लोकांच्या मनोरंजनाचं साधन झाले.

(हेही वाचा-Uttarkashi Tunnel Accident : तब्बल ९ दिवसांनंतर पहिल्यांदा मजुरांनी मिळाली खिचडी, पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा)

भारतातला पहिला टिव्ही

भारतात टिव्ही यायला १६ वर्षे वाट पाहावी लागली. म्हणजे १९५० साली भारतात पहिला टिव्ही आला. आणि १५ सप्टेंबर १९५० साली दूरदर्शनची स्थापना झाली. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या वेळी काही काळ कार्यक्रम प्रसारित केले जायचे आणि १९६५ मध्ये ऑल इंडिया रेडिओचा एक भाग म्हणून नियमित दैनिक प्रसारण सुरू झाले.

आज मोबाईलच्या युगात टिव्ही मागे पडत असला तरी सर्वसामान्य माणसांसाठी, गृहिणींसाठी टिव्ही हे मनोरंजनाचे प्रमुख साधन आहे. टिव्ही ही खरोखरच एक मोठी क्रांती होती. अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण व्हायच्या आधी टिव्हीने लोकांचं मन स्थिर ठेवले हे खरे. ज्यांनी टेलिव्हिजन बनवला त्यांना स्वप्नात देखील वाटलं नसेल की पुढे जाऊन टेलिव्हिजन लोकांच्या घराघरात पोहोचेल.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.