वर्ल्ड ट्रेड पार्क हा जयपूर, राजस्थान येथे स्थित एक शॉपिंग मॉल आहे. २०१२ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. हा मॉल निळ्या रंगाच्या काचेपासून तयार केला असून अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाने सज्ज आहे. या इमारतीची संकल्पना जयपूरच्या अभियंत्यांनी तयार केली होती आणि भारतासह अनेक देशांतील ६० अभियंत्यांच्या टीमने ही इमारत बांधली होती. खान शाहरुख आणि वसुंधरा राजे यांच्या हस्ते या मॉलचे उद्घाटन करण्यात आले होते. (World Trade Park Jaipur)
हा मॉल म्हणजे जयपूरची शान आहे आणि विविध प्रकारचे २४ प्रकल्प यात आहेत. वर्ल्ड ट्रेड पार्क जयपूर हे जागतिक व्यापाराला चालना देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आले होते आणि हा शॉपिंग मॉल शहरातील खरेदीच्या मोहिमेत अव्वल आहे. वर्ल्ड ट्रेड पार्क जयपूरचे बांधकाम २००९ मध्ये सुरू झाले आणि यूएस$५०,०००,००० खर्च करण्यात आले. दोन वर्षांत हे बांधकाम पूर्ण झाले. इमारतीमध्ये दोन स्वतंत्र ब्लॉक्स आहेत; एक उत्तर आणि एक दक्षिण. दोन्ही इमारती एका पुलाने जोडलेल्या आहेत, ज्यामध्ये रेस्टॉरंट्स आहेत. (World Trade Park Jaipur)
(हेही वाचा – Israel-Hamas war: गाझामध्ये लवकरच युद्धबंदी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाला मान्यता)
यांनी केली वर्ल्ड ट्रेड पार्कची सुंदर रचना
अनुप बरतारिया हे वर्ल्ड ट्रेड पार्क आणि सीनियर ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. वर्ल्ड ट्रेड पार्क जयपूरमध्ये एक डिस्प्ले सिस्टीम आहे, जिथे २४ प्रोजेक्टर्समुळे मॉलच्या छतावरच प्रतिमा तयार होते. विशेष म्हणजे जगातील अशा प्रकारची ही पहिलीच यंत्रणा आहे. या मॉलला भारताच्या बीसीआयद्वारे “मॉल ऑफ द इयर” आणि “बेस्ट आर्किटेक्चर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (World Trade Park Jaipur)
या मॉलच्या निर्मितीत खूप पैसा आणि वेळ लागला, कारण त्याची सजावट खूप सुंदर आहे. भारताची ही पहिली इमारत आहे, जिचे इतर काही प्रकल्प देखील जागतिक व्यापाराप्रमाणे जगात सुरू आहेत. यामध्ये पार्क, अंडरवॉटर रेस्टॉरंट, दर्जेदार ऑडिटोरियम, बँक्वेट हॉल (लग्न समारंभ आणि पार्ट्यांसाठी), आंतरराष्ट्रीय मीडिया सेंटर्स, जागतिक दर्जाच्या आलिशान खोल्या असलेले हॉटेल्स बांधण्यात आली आहेत. अनूप बरतारिया यांनी वर्ल्ड ट्रेड पार्कची सुंदर रचना केली आहे. (World Trade Park Jaipur)
(हेही वाचा – South Central Mumbai : दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेसची लॉबिंग : उबाठा शिवसेना हा मतदार संघ सोडणार का?)
सर्वोत्कृष्ट ३डी इफेक्ट्स असलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटगृहांपैकी एक
५२ एकरपेक्षा जास्त जागेवर वसलेले हे सुंदर स्थळ उभारण्यासाठी ३५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा ११ मजल्यांचा देशातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे. इमारतीची वास्तू इतकी आकर्षक आहे की तुम्ही नक्कीच तिच्या प्रेमात पडाल. डोमिनोज, डंकिन डोनट्स, पिझ्झा हट, केएफसी, वांगो, कबाब आणि करी, व्हेजिटेरियन बाय चॉईस, यो चायना, ग्रेट चाट यांसारख्या रेस्टॉरंट्समुळे तुमची पेटपूजा देखील चांगली होते. (World Trade Park Jaipur)
सिनेपोलिस जयपूर दररोज १० हून अधिक चित्रपट वेगवेगळ्या स्क्रीनवर दाखवतात. सिनेपोलिस वर्ल्ड ट्रेड पार्क जयपूर हे सर्वोत्कृष्ट ३डी इफेक्ट्स असलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटगृहांपैकी एक आहे. यामध्ये मुलांचे मनोरंजन करण्यासाठी विविध राइड्स आणि गेम्स आहे, म्हणजे एक मोठा किड्स प्ले झोन आहे. थोडक्यात काय तर हा मॉल – खरेदी, मनोरंजन, पेटपूजा आणि धम्माल करण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. (World Trade Park Jaipur)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community