क्षयरोग हा बहुतेकदा फुफ्फुसांमध्ये होतो, परंतु तो कोणत्याही अवयवावर परिणाम करू शकतो. त्याची लक्षणे सामान्यतः खोकला, रक्तस्त्राव, घसा खवखवणे, ताप आणि वजन कमी होणे ही असतात. क्षयरोग हा एक असा आजार आहे जो हवेतून पसरतो, म्हणून संवेदनशील लोकांनी याबाबत घेतली पाहिजे. (World Tuberculosis Day)
१९८२ पासून दरवर्षी २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. त्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली होती. २४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावला होता. त्या वेळी, क्षयरोग हा एक प्राणघातक साथीचा रोग होता, ज्याने लाखो लोकांचे प्राण घेतले. डॉ. कोच यांच्या या शोधामुळे क्षयरोगाच्या उपचार आणि प्रतिबंधात नवीन आशा निर्माण झाली. (World Tuberculosis Day)
(हेही वाचा – Israel च्या हवाई हल्ल्यात पत्नीसह हमासचा सर्वोच्च नेता बर्दावील ठार)
या ऐतिहासिक शोधाच्या १०० वर्षांच्या निमित्ताने १९८२ मध्ये प्रथमच जागतिक क्षयरोग दिन पाळण्यात आला. तेव्हापासून, दरवर्षी हा दिवस पाळला जातो. लोकांना क्षयरोगाच्या धोक्यांबद्दल जागरूक करणे आणि ते रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर देणे आहे, हा या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे. (World Tuberculosis Day)
दरवर्षी या दिवशी, कार्यक्रम आणि विविध उपक्रम आयोजित करून लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याचे आणि पसरवण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाते. उपचारासाठी, क्षयरोगाच्या रुग्णाला नियमित औषधे घेणे, संपूर्ण आहार घेणे आणि विश्रांती घेणे आवश्यक असते. क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत, ज्यामध्ये रुग्णांसाठी मोफत उपचार, जागरूकता कार्यक्रम आणि तांत्रिक प्रगती यांचा समावेश आहे. (World Tuberculosis Day)
(हेही वाचा – अंधारातून प्रकाशाकडे: Chhattisgarh मधील नक्षलग्रस्त गाव सात दशकांनंतर विजेने उजळले)
भारत सरकारने २०२५ पर्यंत क्षयरोग पूर्णपणे नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी लसीकरण, तपासणी शिबिरे आणि योग्य उपचारांची तरतूद असे सतत प्रयत्न केले जात आहेत. दरवर्षी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त या गंभीर समस्येवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक विशेष थीम ठेवली जाते. २०२५ ची थीम आहे – “होय! आपण क्षयरोगाला हरवू शकतो!”. याचा अर्थ असा की आपण एकत्रितपणे या आजाराचे उच्चाटन करू शकतो. गरज आहे ती फक्त जागरूकता आणि एकत्रित प्रयत्नांची. चला तर मग आपण क्षयरोगाचा खात्मा करु! (World Tuberculosis Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community