World Vegan Day : काय आहे या दिवसाचे महत्त्व ?

वीगन संस्थेच्या स्थापनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त युनायटेड किंगडममधील 'द वीगन सोसायटी'चे तत्कालीन अध्यक्ष लुईस वॉलिस यांनी १९९४ मध्ये हा उपक्रम सुरु केला.

209
World Vegan Day : काय आहे या दिवसाचे महत्त्व ?
World Vegan Day : काय आहे या दिवसाचे महत्त्व ?
वर्ल्ड वीगन डे म्हणजेच जागतिक शाकाहारी दिन दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी जगभरातील शाकाहारी लोकांद्वारे साजरा केला जातो. (World Vegan Day) हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये शाकाहारी जेवणाची आवड निर्माण करणे. वीगन आहार सेवन करणारे लोक मांसाहारी, तसेच दूध, मध, पशू खाद्य इत्यादी आहारांचे सेवन करत नाहीत. (World Vegan Day)
वीगन संस्थेच्या स्थापनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त युनायटेड किंगडममधील ‘द वीगन सोसायटी’चे तत्कालीन अध्यक्ष लुईस वॉलिस यांनी १९९४ मध्ये हा उपक्रम सुरु केला. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आपल्याकडील अनेक शाकाहारी दूग्धजन्य किंवा पशूजन्य आहार सेवन करतात.  (World Vegan Day)
मात्र वीगन लोकांना हे मान्य नाही. या लोकांचे म्हणणे आहे की, मांसाहारी अन्न सेवन केल्याने अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्याचबरोबर निरपराध प्राण्यांची कत्तल देखील करण्यात येते. ‘मानवाने शुद्ध शाहाकारी जीवनशैलीचे अनुसरण केले पाहिजे’, असा संदेश या उपक्रमाद्वारे दिला जातो. (World Vegan Day)
दरवर्षी हा दिवस साजरा करतांना वेगवेगळी थीम ठेवण्यात येते. २०२३ ची थीम आहे ’फ्यूचर नॉर्मल’.  ‘वर्ल्ड वीगन डे’चे औचित्य साधून निरोगी जीवनशैलीवर लक्ष्य केंद्रित केले जाते. कोणत्याही प्रकारे नैसर्गिक हानी होऊ नये आणि निसर्गाचे समतोल राखले जावे; म्हणून वीगन लोक आग्रही असतात. खरेतर वीगन हा शब्द वेजिटेरियन या शब्दातून घेण्यात आला आहे.
आपल्या भारतात देखील अनेक काळापासून शाकाहाराचे सेवन करणारे लोक आहेत. त्यांना कोणत्याही पोषण तत्वांची कमतरता जाणवत नाही. खरे पाहता वीगन आहारातून ऍंटिऑक्सिडेंट, फायबर मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मॅग्नेशियम, फोलेट, पोटेशियम, विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन ई देखील पुरेशा प्रमाणात प्राप्त होतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वीगन आहार घेतल्यास कॉलेस्टेरॉल देखील नियंत्रणात राहते. उच्च रक्तदाब देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. असा अनेक कारणांसाठी हा दिवस साजरा केला जातो. इतरांना वीगन बनण्यास प्रोत्साहन दिले जाते. (World Vegan Day)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.