World Water Day : म्हणून साजरा केला जातो जागतिक जल दिन

निसर्ग आपल्याला पाणी चक्राच्या रूपात प्रदान करतो, आपण देखील या चक्राचा एक महत्त्वाचा भाग आहोत. चक्र फिरत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, चक्र थांबले म्हणजे आपले जीवन थांबले.

200
World Water Day : म्हणून साजरा केला जातो जागतिक जल दिन

गोड्या पाण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि गोड्या पाण्याच्या स्त्रोतांच्या व्यवस्थापनासाठी दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day) साजरा केला जातो. जागतिक जल दिनाची पायाभरणी १९९२ साली झाली. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित पर्यावरण आणि विकास परिषदेत पहिले पाऊल टाकले गेले. या दिवशी जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघाने मान्य केला आणि २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. (World Water Day)

१९९३ मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जगातल्या १.५ अब्ज लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. भारतासह जगभरात अनेक ठिकाणी पाण्याचे संकट वाढत आहे. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार २०५० पर्यंत भारतात जगातील सर्वाधिक जलसंकट असेल. यासोबतच भारताचे शेजारी देश चीन आणि पाकिस्तानलाही जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. यूएन च्या अहवालानुसार, जगातील १.७ ते २.४० अब्ज शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागेल. (World Water Day)

(हेही वाचा – ISRO Pushpak : २१ व्या शतकात पुष्पकचे यशस्वी लॉन्चिंग; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये)

ही आहे यावर्षाची थीम 

निसर्ग आपल्याला पाणी चक्राच्या रूपात प्रदान करतो, आपण देखील या चक्राचा एक महत्त्वाचा भाग आहोत. चक्र फिरत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, चक्र थांबले म्हणजे आपले जीवन थांबले. निसर्गाच्या खजिन्यातून आपण जे काही पाणी घेतो ते आपल्याला परत करावे लागते. (World Water Day)

वाचकहो, आपण स्वत: पाणी निर्माण करू शकत नाही, त्यामुळे नैसर्गिक संसाधने प्रदूषित होऊ न देण्याची आणि पाण्याचा अपव्यय न करण्याची जबाबदारी आपली आहे. दरवर्षी जागतिक जल दिन (World Water Day) एका थीम अंतर्गत साजरा केला जातो. या वर्षाची २०२४ ची थीम आहे, ’Leveraging Water for Peace.’ शांततेसाठी पाण्याचा वापर आहे. याद्वारे लोक, समुदाय आणि पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या पाण्याशी संबंधित गंभीर समस्यांचे निराकरण केले जाईल. (World Water Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.