जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच World Youth Skills Day दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २०१४ मध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा (World Youth Skills Day) करण्याची घोषणा केली होती, तेव्हापासून दरवर्षी १५ जुलै हा दिवस जगभरात युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. (World Youth Skills Day)
हा दिवस जगभरातील तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी साजरा केला जातो. यूएन च्या मते, जागतिक युवा कौशल्य दिनाचे उद्दिष्ट युवकांना रोजगारक्षमता आणि उद्योजकतेसाठी कौशल्याने सुसज्ज करण्याचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आहे.
(हेही वाचा – Bhushan Gavai : राज्यातील न्यायदानाची गती वाढणार; ऑनलाईन सुनावणी कक्ष व अभिलेख कक्षाचे उद्घाटन)
जगभरातील तरुणांमधील बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी तसेच त्यांच्या कौशल्याबाबत जनजागृती करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) अस्तित्वात आला. हा दिवस ११ नोव्हेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने श्रीलंकेच्या पुढाकाराने साजरा करण्याची घोषणा केली होती. अशा प्रकारे १५ जुलै २०२४ रोजी प्रथमच जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत तो दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो.
(हेही वाचा – Pooja Khedkar : ‘ती’ ऑडी कार पुणे पोलिसांच्या ताब्यात)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतात कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी कौशल्य विकासाला देखील महत्त्व प्राप्त करुन दिले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी “कौशल्य भारत” अभियान सुरु केला आहे. या दिनानिमित्त जगभरात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये तरुणांना शैक्षणिक संस्था, नियोक्ते, धोरण निर्माते आणि विकास भागीदार यांच्याशी संवाद साधण्यासाठी मंच प्रदान करुन दिला जातो.
या दिवसाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध देशांतील युवक विज्ञान, कला आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवून कार्यक्रमात सहभागी होतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community